‘लिव्हिंग विल’ : का आणि कशासाठी?

‘लिव्हिंग विल’बद्दल एक सुंदर विवेचन जेसिका झिटर या ‘आयसीयू’मध्ये अनेक वर्ष काम केलेल्या डॉक्टरांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत.
shubda joshi writes about  Living Will Why and for what
shubda joshi writes about Living Will Why and for whatsakal
Summary

‘लिव्हिंग विल’बद्दल एक सुंदर विवेचन जेसिका झिटर या ‘आयसीयू’मध्ये अनेक वर्ष काम केलेल्या डॉक्टरांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत.

‘लिव्हिंग विल’बद्दल एक सुंदर विवेचन जेसिका झिटर या ‘आयसीयू’मध्ये अनेक वर्ष काम केलेल्या डॉक्टरांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. पुस्तकाचे नांव- Extreme Measures- Finding a better Path to the End of Life. त्या म्हणतात, की या शेवटाकडे जाणाऱ्या मार्गाचा विचार करताना सहा गोष्टींचा विचार करायला हवा-

आपल्या आरोग्याची स्थिती कशी आहे, याचा अलिप्तपणे विश्लेषण करायला हवे. कधी कधी अपघातामुळे, एखाद्या आजारामुळे रुग्णांना यंत्राचे साह्य घ्यावे लागते. परंतु, पुढे जाऊन त्यांचे हे अवलंबित्व संपते. पूर्वी असे झाले असले तरी आता या क्षणी परिस्थिती काय आहे, याचा आढावा घ्यायला हवा. आपण पुढे उल्लेख केलेल्या कोणत्या श्रेणीत आहोत हे बघायला हवे- तरुण आणि निरोगी, वयस्कर; पण तंदुरूस्त, काही आजार असलेले, दुर्धर आजार झालेले, मृत्युजवळ येऊन ठेपलेला. यापैकी कोणत्या तरी एका श्रेणीत आपण असतोच.

या सर्वांचा विचार केल्यावर आपला आरोग्याचा प्रवास कोणत्या दिशेने चालला आहे, हे समजून घ्यावा. कोणताही आजार असला तरी त्यामुळे आपल्यात होणारे बदल साधारणपणे आपण जाणून घेऊ शकतो. उदा. एखाद्या सशक्त माणसाला हार्ट ॲटॅक आला तर त्याचा मोठा धक्का बसून येणारे डिप्रेशन व त्याच्या धास्तीने तब्येत ढासळू शकते.

ज्यांना कॅन्सरसारखे दुर्धर आजार जडले असतील तरी ते काही काळ उत्तम आयुष्य जगू शकतात, पण हळुहळू त्यांची शक्ती कमी होत जाते. किडनी किंवा इतर अवयव काम करेनासे झाले, तर त्या आजाराने येणाऱ्या मर्यादा समजू शकतात,

परंतु अशांना आपण मृत्युकडे झपाट्याने जात आहोत, हे पटत नाही. डिमेन्शिया, अल्झायमर यांसारख्या आजारात पुढे कधी काय होईल, याचा अंदाज बांधणे अवघड असते. त्यामुळ आपण नक्की कोणत्या परिस्थितीत आहोत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

आजाराबद्दल सामान्य ज्ञान जरी उपयोगी पडत असले तरी तुम्ही किंवा तुमच्या प्रिय माणसाच्या वैयक्तिक आयुष्यात काय काय घडण्याची शक्यता आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ट्रीटमेंटमुळे होणारे फायदे-तोटे, आयुर्मर्यादाचे ढोबळ अंदाज,

हे अनुभवी डॉक्टरांकडून मोकळेपणाने संवाद साधून जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एखादा आजार कोणत्या दिशेने बळावेल?, पेशंट अजून पाच वर्षे जगला तर आश्चर्य वाटेल का?, जी ट्रीटमेंट द्यायची आहे, त्याचे फायदे किती, तोटे किती?

म्हणजे जर दोन महिने आयुष्य वाढणार असेल, परंतु त्या काळात सतत बेचैनी वाढणार असेल तर ती ट्रीटमेंट घेतली नाही तर काय होईल?, असे साधारण प्रश्न आणि त्यांची खरी उत्तरे मनातील गोंधळ कमी करण्यास मदत करू शकतात.

आजारी व्यक्तीला काय महत्त्वाचे वाटते, याचाही विचार व्हायला हवा. थोडा वेळ काढून शांतपणे स्वतःचा स्वतःशीच विचार करून पुढील मुद्द्यांवर आपलीच मते जाणून घेणे गरजेचे आहे- आपण जिवंत असणे म्हणजे मला नक्की काय वाटते?, येणाऱ्या क्षणाकडे मी कसे पाहतो?, ओझे वाटते की आनंद?, आयुष्यात कितपत वेदना सुसह्य वाटतात?

, स्वतःचे प्रार्तविधी स्वतःच करता येणे, स्वतःला स्वच्छ ठेवता येणे, विचार करता येणे, घरातल्या घरात हिंडता येणे हे किती महत्त्वाचे वाटते?, आवडणाऱ्या गोष्टींत आवडीने सहभागी होता येणे याचे किती महत्त्व वाटते?, स्वतःच्या घरी राहणे आणि एखाद्या हॅास्पिटलमध्ये राहणे, याबद्दल काय वाटते?, कुटुंबावर येणारे ओझे- मग ते आर्थिक/मानसिक/शारिरीक याबद्दल काय वाटते?

आयुष्य लांबविण्याबद्दलचे विचार काय आहेत? मशीनच्या साह्याने आयुष्य लांबवता येते. डॉक्टर जेसिका म्हणतात, ‘‘मी जेव्हा असे पेशंट्स पाहते, तेव्हा खूपदा वाटतं की याच पेशंट्सनी अशी स्थिती असल्यास काय करावं हे बोलून-लिहून ठेवलं असतं, तर नक्कीच ‘मला असं जगवू नका’ असंच लिहून ठेवलं असतं. पण तसं त्यांनी बोलून-लिहून ठेवलं नसल्यामुळे सगळेच हतबल असतात, आणि नातेवाईक व डॉक्टर जगवण्याचे प्रयत्न करीतच राहतात.

तुमच्या विचारात जर स्पष्टता असेल, पण जर तुम्ही तसे बोलून-लिहून ठेवले नसेल, तर तुम्हाला मशीनच्या साह्याने जिवंत ठेवणे कितीही क्लेशकारक वाटत असेल तरी आपली काळजी घेणाऱ्यांना तसे न करण्याचा परस्पर निर्णय घेणे अतिशय अवघड असते.

जवळच्या नातेवाईकांशी बोलून आपली स्पष्ट मते त्यांना सांगितलीच पाहिजेत आणि लिहूनही ठेवायला हवीत. तसे केले तर तुमच्या जिवलगांना तुमच्या मताचा आदर करणे शक्य होईल आणि तुमचा शेवटपर्यंतचा प्रवास तुम्हाला हवा तसा होईल.

या सर्वांचा विचार करून अतिशय सोप्या भाषेत लिहून काढलेले आपले मनोगत म्हणजेच ‘लिव्हिंग विल’!

लिव्हिंग विल’चा फॉरमॅट काय?

खूपदा असे विचारले जाते, की ‘लिव्हिंग विल’चा फॉरमॅट आहे का? पण या लेखात नमूद केलेल्या गोष्टींचा विचार केला की लक्षात येईल, की असा फॉरमॅट करणे शक्य नाही. जगणे जसे वैयक्तिक आहे, तसाच मृत्यूही अतिशय वैयक्तिक आहे. तो शेवटचा प्रवास आपल्याला हवा तसा, सुंदर करण्यासाठी मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून त्याच्याकडे धीराने पाहिले पाहिजे आणि तुम्हाला बेबस करण्याचा अधिकार त्याच्याकडून काढून घेऊन, निर्णय घेणाऱ्यांना विवेकी धीर देऊन त्यांना अपराधीपणाची भावना येणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. ‘लिव्हिंग विल’ वेळेवर करून हे सहजसाध्य करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com