कारण उलगडले; म्हणून 'सीसीडी'चे मालक सिद्धार्थ यांनी केली आत्महत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

सिद्धार्थ यांनी आत्म्यहत्या करण्याची कारणे उलगडत चालली आहे

मुंबई: कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांनी आत्म्यहत्या केली. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. आता मात्र त्यांनी आत्महत्या करण्याची कारणे उलगडत चालली आहे. सिद्धार्थ यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ एक हजार कोटी रुपयांच्या ओझ्याखाली होते. कंपनी कामकाज मंत्रालयाकडून ही माहिती मिळाली आहे. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी सिद्धार्थ यांनी कमर्चाऱ्यांना कंपनीवरील कर्ज वाढत असल्याचे सांगितले होते. 

विविध कंपन्यांकडून घेतले कर्ज:
देवदर्शिनी इंफो टेक्नोलॉजीज्, गोनीबीडू कॉफी आणि कॉफी डे कॉन्सिलिडेशनच्या माध्यमातून हे कर्ज घेण्यात आले आहे. यामध्ये गोनीबीडूचे 450 कोटी रुपये, कॉफी डे ग्लोबल 883 कोटी आणि टॅगलिन रिटेलच्या 798 कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. 

शेअर ठेवले तारण:
सिद्धार्थ यांची कॅफे कॉफी डे शेअर बाजारात नोंदणीकृत कंपनी आहे. या कंपनीत त्यांची आणि त्यांच्या मालकीच्या समूहाची 53.93 टक्के हिस्सेदारी आहे. 30 जून पर्यंत यातील 75.70 टक्के शेअर कंपनीने तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले होते. आदित्य बिर्ला फायनान्स, कोटक महिंद्रा बँक. एके कॅपिटल्स एससीटीआय फायनान्स, आरबीएल बँक एसएसजी एशिया यांच्याकडे शेअर तारण ठेऊन कर्ज घेतले होते. दोन दिवसांपूर्वी  बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच शेअर बाजारामध्ये "कॉफी डे एंटरप्रायजेस'ला मोठा फटका बसून या कंपनीचे एकाच दिवसात 813 कोटी रुपयांचे बाजारभांडवल कमी झाले. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते.

आज मुंबई शेअर बाजारात कॅफे कॉफी डेचा शेअर 110.50 रुपयांवर व्यवहार करत असून तो 9.98 टक्क्यांनी घसरला आहे. सध्याच्या शेअर बाजारभावानुसार कंपनीचे 2,343.84 कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhartha had personal debt of more than Rs 1000 crore