तेल महागण्याची चिन्हे

इंडोनेशियाचा पाम तेल निर्यात घटवण्याचा निर्णय
oil
oilsakal

नवी दिल्ली : खाद्य तेलाच्या किमतीचा पुन्हा एकदा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने पाम तेलाच्या किमतीवर ग्राहकांना दिलेला दिलासा आता फार काळ टिकणार नसल्याचे दिसते आहे. कारण भारताला (India)सर्वाधिक पाम तेल निर्यात (Palm oil export)करणाऱ्या इंडोनेशियाने (Indonesia) पाम तेलाची निर्यात घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतात पाम तेलाची आवक घटून त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.

oil
विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा तरुणाचा डाव फसला

केंद्र सरकारने नुकत्याच खाद्य तेलाच्या किमती आवाक्यात आणण्यासाठी काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले होते; परंतु इंडोनेशियाने पाम तेल निर्यात घटवण्याचा निर्णय घेतल्याने त्या निर्णयांवर पाणी फेरले जाणार आहे. खाद्य तेल उद्योगांशी संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ते इंडोनेशियाकडून होणारी तेलाच्या आयातीतील कपात मलेशियातून होणारी आयात वाढवून भरून काढू इच्छित आहेत; परंतु तेथूनही इतके पाम तेल येणे शक्य नाही. इंडोनेशियाने देशांतर्गत पाम तेलाच्या किमती कमी करण्यासाठी निर्यात कपातीचा निर्णय घेतलेला आहे.

oil
अकोला : २४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार

भारत आपल्या एकूण गरजेनुसार ६० टक्के पाम तेलाची आयात इंडोनेशियाहून करतो. त्यामुळे इंडोनेशियातून पाम तेलाच्या आयातीत घट झाल्यास त्याचा परिणाम भारतातील ग्राहकांवर होतो. भारत आपल्या एकूण आवश्यकतेच्या दोन तृतीयांश खाद्य तेल आयात करतो, जे जवळपास १.५ कोटी टनांहून अधिक असते. इंडोनेशियानंतर भारतात सर्वाधिक पाम तेलाची आयात मलेशियातून होते, ज्याचे प्रमाण देशाच्या आवश्यकतेनुसार तब्बल ४० टक्के आहे.

मोहरीचे तेल स्वस्त होणार?

यंदाच्या वर्षी मोहरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघण्याची शक्यता आहे. १२० लाख टन मोहरी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात मोहरीच्या तेलाचे दर आटोक्यात येण्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये मोहरीच्या तेलाची किंमत २०० रुपये प्रति लिटरवर पोहोचली होती. २०२० - २१ मध्ये जवळपास ८७ लाख टन मोहरीचे उत्पादन झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com