सहा महिन्यांत वित्तीय तूट 92.6 टक्के पूर्ण 

सहा महिन्यांत वित्तीय तूट 92.6 टक्के पूर्ण 

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत वित्तीय तूट 6.51 लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे.  अर्थसंकल्पी अंदाजाच्या तुटीचे 92.6 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सरकारचा कर महसूल आणि खर्च यामधील तफावत (वित्तीय तूट) वाढत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. 

चालू वर्षासाठी सरकारने सात लाख कोटींपर्यंत वित्तीय तुटीचा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त केला होता. मात्र पहिल्या सहा महिन्यांत यापैकी 92.6 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. महालेखा नियंत्रकांनी गुरूवारी (ता.31) वित्तीय तुटीची आकडेवारी जाहीर केली; ज्यात 30 सप्टेंबरअखेर वित्तीय तुटीचा आकडा  6.51 लाख कोटींवर गेला आहे. सुधारित अंदाजानुसार वित्तीय तूट अर्थसंकल्पी तरतुदीच्या 91.7 टक्के असल्याचे महालेखा नियंत्रकांनी म्हटले आहे. 

अर्थसंकल्पाच्या अंदाजानुसार सरकारला पहिल्या सहा महिन्यांमध्ये 40.2 टक्के कर महसूल मिळाला. याच कालावधीत सरकारचा खर्च 53.4 टक्के होता. दरम्यान, सरकारचा भांडवली खर्च 55.5 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. विकासकामांकरिता सरकारने सढळ हाताने खर्च केल्याने अर्थचक्राला गती मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

web title : In six months, the fiscal deficit was 92.6 percent

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com