स्मार्ट तंत्रज्ञान स्मार्ट सिटी उभारण्यास फायदेशीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

मुंबईत आयोजित केलेल्या "स्मार्ट एशिया' प्रदर्शनात स्मार्ट सिटी पर्याय, स्मार्ट टेक्‍नोलॉजी ऍप्लिकेशन्स आणि शहर विकास उत्पादने आणि सेवांसंबंधी लक्ष केंद्रित करणारे पर्याय सादर करण्यात आले आहेत

मुंबई:  जगातील निम्म्याहून अधिक जनता ही शहरांत राहते आणि 2050 पर्यंत दोन तृतीयांशहून अधिक नागरिक शहरांकडे कूच करणार आहेत. स्मार्ट तंत्रज्ञान स्मार्ट सिटी उभारण्यास फायदेशीर ठरणार असून सरकारने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या "स्मार्ट एशिया' प्रदर्शनात स्मार्ट सिटी पर्याय, स्मार्ट टेक्‍नोलॉजी ऍप्लिकेशन्स आणि शहर विकास उत्पादने आणि सेवांसंबंधी लक्ष केंद्रित करणारे पर्याय सादर करण्यात आले आहेत. तैवान एक्‍सर्टनल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल (TAITRA) समवेत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीच्या साह्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

बेंगळूरू येथील दोन यशस्वी आवृत्त्यांनंतर मुंबईत पहिल्यांदाच हा कार्यक्रम संपन्न होत असून त्यात स्मार्ट सिटी क्षेत्रातील उद्योग नेत्यांना एकत्र आणले आहे. "स्मार्ट एशिया'च्या मदतीने मुंबईत स्मार्ट सिटी पर्याय जसे की, स्मार्ट वाहतूक, स्मार्ट ऊर्जा, स्मार्ट जल व्यवस्थापन, शाश्‍वत पर्यावरण, आयओटीसारखे पर्याय उपलब्ध होतील. तैवान एक्‍सर्टनल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिलच्या एक्‍झिबिशन डिपार्टमेंट एक्‍झिक्‍युटिव्ह डायरेक्‍टर एमिलीया शीह म्हणाल्या की, स्मार्ट सिटी उभारणे हा एक ग्लोबल ट्रेंड झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून आणि सध्याच्या वीज वापराचे ट्रेंड्‌स तसेच वाहतूक व पाणी व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांसह, मुंबई व त्याच्या आसपासच्या शहरांना शाश्‍वत पर्यावरणीय पर्यावरण सुनिश्‍चित करण्यासाठी अक्षय ऊर्जेची स्मार्ट उपाययोजना अवलंबणे अत्यावश्‍यक आहे. भारत आणि तैवान यांच्यातील दीर्घकालीन भागिदारीमुळे परस्पर फायदेशीर आर्थिक वाढीसह स्मार्ट आशिया भारताच्या कायम विकसनशील गरजा भागवू शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भारतातील तैपेई इकॉनॉमिक ऍण्ड कल्चर सेंटरचे प्रतिनिधी ऍम्ब. चुंग-क्वान टीएन उपस्थित होते. 
--- 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart Technology Benefits of Building a Smart City