esakal | लवकरच येणार स्नॅपडीलचा आयपीओ
sakal

बोलून बातमी शोधा

IPO

लवकरच येणार स्नॅपडीलचा आयपीओ

sakal_logo
By
सकाळ डिजिटल टीम

- शिल्पा गुजर

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ई-रिटेलर स्नॅपडील 40 कोटी डॉलर्सचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे स्नॅपडील सध्या सल्लागाराशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आहे. अहवालानुसार, प्रस्तावित आयपीओसाठी स्नॅपडीलचे मूल्यांकन (Valuation) 2.5 अब्ज डॉलर असू शकते. ही योजना अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचेही अहवालात म्हटले आहे. शिवाय, कंपनी ही योजना बंद करू शकते किंवा रद्दही करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीओ पुढच्या वर्षी लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे. पण आम्ही स्वतंत्रपणे या बातमीची पुष्टी करत नाही.

ब्लूमबर्गने जेव्हा या बातमीवर स्नॅपडील आणि सॉफ्टबँककडून माहिती मागितली तेव्हा त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. स्नॅपडीलचे मुख्य कार्यालय गुडगावमध्ये आहे. याची स्थापना 2010 मध्ये झाली. सध्या या प्लॅटफॉर्मवर 800 कॅटेगरीच्या आसपास 6 कोटी उत्पादने नोंदणीकृत आहेत. ही कंपनी भारतातून 6000 पेक्षा जास्त शहरांमध्ये पोहोचते.

हेही वाचा: अदर पुनावालांनी मुंढव्यात 13 फ्लोअरसाठी मोजले 464 कोटी

2021 मध्ये आतापर्यंत सुमारे 36 कंपन्यांनी 60200 कोटी रुपयांचे आयपीओ आणले आहेत. बरेच स्टार्टअप्स लिस्टींगच्या तयारीत आहेत. ते फिन्टेक किंवा ई-कॉमर्स उद्योगाशी संबंधित आहेत. फिनटेक कंपनी पेटीएम, इन्शुरन्स एग्रीगेटर पॉलिसी मार्केट आणि फॅशन आणि कॉस्मेटिक ई-रिटेलर नायका यांनी त्यांच्या आयपीओसाठी सेबीमध्ये कागदपत्रे दाखल केली आहेत. पुढील काही महिन्यांत हे आयपीओ बाजारात येतील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top