500 कुटुंबांनी बनविलेल्या बायोइंधनातून पहिल्यांदाच उडाले विमान

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

रविवारी डेहराडून ते दिल्ली या प्रवासादरम्यान 'स्पाइसजेट'च्या Bombardier Q400 या विमानाने बायोफ्युएल वापरून यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण आज प्रस्तावित होते. मात्र, एक दिवस अगोदरच ते आकाशात झेपावले. विशेष म्हणजे हे बायोइंधन 500 कुटुंबांनी मिलून तयार केले आहे.  

नवी दिल्ली : भारताच्या मानपेचात आज आणखी एक तुरा रोवला गेला आहे. बायो फ्युएलचा वापर करून विमान भरारी घेणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया पाठोपाठ आता भारत देखील विराजमान झाला आहे. रविवारी डेहराडून ते दिल्ली या प्रवासादरम्यान 'स्पाइसजेट'च्या Bombardier Q400 या विमानाने बायोफ्युएल वापरून यशस्वी उड्डाण केले. हे उड्डाण आज प्रस्तावित होते. मात्र, एक दिवस अगोदरच ते आकाशात झेपावले. विशेष म्हणजे हे बायोइंधन 500 कुटुंबांनी मिलून तयार केले आहे.  

या उड्डाणासाठी 'कौन्सिल ऑफ साइंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च' आणि डेहराडूनच्या 'इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोलियम' यांनी संयुक्तपणे 400 किलो बायो जेट इंधन तयार केले. हे इंधन तयार करण्यासाठी व्हेजिटेबल ऑइल, साखर, प्राण्याची चरबी आणि जैवइंधन वापरण्यात आले आहे.  काल (रविवार) सकाळी 6.31 ते 6.53 च्या दरम्यान हे उड्डाण घेण्यात आले. 

Web Title: SpiceJet Operates India s First Test Flight Powered by Bio Fuel