नवी ‘डिस्कव्हर ११०’ बाजारपेठेत सादर

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

पुणे - बजाज ऑटोने नव्या स्टायलिश लुकसह दमदार ताकदीची ‘डिस्कव्हर ११०’ बाजारपेठेत सादर केली आहे. काळ्या, लाल आणि निळ्या रंगात ही दुचाकी उपलब्ध आहे. 

पुणे - बजाज ऑटोने नव्या स्टायलिश लुकसह दमदार ताकदीची ‘डिस्कव्हर ११०’ बाजारपेठेत सादर केली आहे. काळ्या, लाल आणि निळ्या रंगात ही दुचाकी उपलब्ध आहे. 

वेगळी स्टाइल, इंधन वाचविण्याची क्षमता आणि चांगली कामगिरी, यामुळे डिस्कव्हर दुचाकींनी बाजारात स्थान मिळविळे आहे. आता याच श्रेणीत आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज ‘डिस्कव्हर ११०’ बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे. या दुचाकीला दोन ‘एलईडी डे रनिंग लाईट्‌स’ हेडलॅम्प आहेत. या दुचाकीचे हेडलॅम्प लांबूनही दिसतात, त्यामुळे दुचाकीची सुरक्षितताही वाढली आहे. तसेच अपघाताची शक्‍यताही कमी होत आहे. याचबरोर दुचाकीमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. दुचाकीची रचना अधिक आकर्षक करण्यात आल्यामुळे तिला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

‘डिस्कव्हर ११०’मध्ये डिजिटल स्पिडोमीटर आहे. थेट सूर्यप्रकाशातही स्पिडोमीटर दिसू शकेल असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या दुचाकीचे इंजिन आधुनिक फोर स्ट्रोक, एअर कूल्ड, सिंगल सिलिंडरचे डीटीएस-आय आहे. शहरातील रस्त्यावर सहजपणे धावेल अशा पद्धतीने दुचाकी बनविण्यात आली आहे.

Web Title: sports news pune bajaj Discover 110

टॅग्स