स्टारबक्‍सच्या उत्पादनांची नेस्ले करणार विक्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

झुरिच - ‘स्टारबक्‍स’च्या उत्पादनांच्या विक्री हक्कासाठी  स्वित्झर्लंडमधील खाद्यपदार्थ क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘नेस्ले’ ७.१५ अब्ज डॉलर मोजणार आहे. नेस्लेच्या जगभरातील कॉफी शॉपवर स्टारबक्‍सची उत्पादने विकली जाणार आहेत. या करारामध्ये स्टारबक्‍सचे कॉफी शॉप आणि कॅफेंचा समावेश नाही. नेस्ले कंपनीचे नेसकॅफे आणि नेस्प्रोसे हे ब्रॅंड प्रसिद्ध आहेत. स्टारबक्‍सची उत्पादने कंपनी आता विकणार असून, यामुळे कंपनीच्या व्यवसायात उत्तर अमेरिकेत वाढ होणार आहे. नेस्लेने व्यवसायातील वाढीसाठी कॉफीवर भर दिला असून, यासाठी या क्षेत्रातील काही व्यवसाय याआधी ताब्यात घेतले आहेत. 

Web Title: starbus production sailing by nestle