स्टार्टअप कंपन्यांनी उभारला ३८.३ अब्ज डॉलरचा निधी

पीटीआय
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

नवी दिल्ली - भारतातील विविध स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या वर्षभरात (२०१८) सुमारे ३८.३ अब्ज डॉलरचा निधी उभारल्याचे ‘योस्टार्टअप’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. याबाबतीत केवळ अमेरिका व चीन हे देश भारताच्या पुढे आहेत. 

योस्टार्टअपने आपला अहवाल गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार, निधी उभारणीत ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’चा वाटा सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यापाठोपाठ ‘स्विगी’ने १.३ अब्ज डॉलर तर, ‘ओयो’ने १ अब्ज डॉलरचा निधी उभारल्याचे अहवालात म्हटले आहे. याबरोबरच पेटीएम मॉलने ८९.५, रिन्यू पॉवर ४९.५, बायजू ४२.२, तर झोमॅटोने अंदाजे ४१ कोटी डॉलरचा निधी जुळवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, निधी उभारण्याच्या प्रमाणात भारतामध्ये उल्लेखनीय वाढ झाली असून, यात अमेरिका, चीनच्या तुलनेत एशियातील स्टार्टअप कंपन्या आघाडीवर असल्याचे अहवालात म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Startup Company Fund