अमेरिकेतील विमान कंपन्यांना झाला तब्बल एवढ्या डॉलरचा तोटा; किती ते वाचा

Aeroplane
Aeroplane

अमेरिकन एअरलाईन्ससमोर मोठे संकट
अमेरिेकेतील विमानसेवा कंपन्यांना दरमहिन्याला १० अब्ज डॉलरपेक्षा अधिकचा तोटा होतो आहे. कोविड -१९ महामारीमुळे या कंपन्यांच्या प्रवाशांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. अमेरिकेतील विमानसेवा कंपन्यांना देशांतर्गत प्रवासासाठी एका विमानामागे दोन डझनांपेक्षाही कमी प्रवासी मिळत आहेत. अमेरिेकेतील ३,००० पेक्षा जास्त विमाने सध्या विश्रांती घेत आहेत. ही संख्या अमेरिेकेतील विमान कंपन्यांमधील एकूण विमानाच्या जवळपास ५० टक्के इतकी आहे. यात अमेरिकेतील चार सर्वात मोठ्या विमानसेवा कंपन्यांचाही समावेश आहे. असे असतानाही देशांतर्गत उड्डाणे भरणाऱ्या प्रत्येक विमानात सरासरी फक्त १७ प्रवासीच येत आहेत. तर आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये एका विमानात सरासरी २९ प्रवासीच येत आहेत.

अमेरिकेतील विमान प्रवाशांच्या संख्येत जवळपास १०० टक्क्यांची घट झाली आहे. जर विमान कंपन्यांना प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटाचे पैसे परत करावे लागले तर त्याचा विपरित परिणाम होऊन कंपन्यांकडील रोकड संपून त्या दिवाळखोर होतील, अशी भीती अमेरिकेतील सिनेट सदस्यांच्या गटाने व्यक्त केली आहे.

'एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला तात्पुरती आणि खास अशी मदत केली जावी', अशी मागणी एरोस्पेस इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रमुख एरिक फॅनिंग यांनी केली आहे. बोईंग या जगातील आघाडीच्या कंपनीने यावर्ष अखेरीपर्यत १६,००० नोकऱ्यांची कपात करण्याची घोषणा मागील आठवड्यात केली आहे. तर जीई एव्हिएशन देखील १३,००० कर्मचाऱ्यांची कपात आणि स्पिरिट एरोसिस्टम्स होल्डिंग्स १,४५० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'या क्षेत्रात खासगी-सरकारी भागीदारीच्या माध्यमातून नोकऱ्या वाचवण्यासाठी मोठा आधार आहे आणि यातून कोविड-१९च्या महामारीच्या काळातसुद्धा कर्मचाऱ्यांना नोकरीत ठेवता येईल', असे मत फॅनिंग यांनी व्यक्त केले आहे. तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आणि ट्रेझरीने कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात आणलेल्या योजनांची गती आणि लवचिकता यामुळे कंपन्यांना त्यातून मदत घेण्यात अडथळा निर्माण होतो आहे, असेही पुढे ते म्हणाले.

अमेरिकेतील विमानसेवा कंपन्यांनी नियोजित उड्डाणांपैकी ८० टक्के उड्डाणे रद्द केली आहेत. अमेरिकेतील प्रवाशांच्या संख्येत मार्चपासून ९५ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिकेतील विमानसेवा कंपन्या यामुळे मोठ्या संकटात सापडल्या असून त्यांच्यासमोर पुढील काळ हा अधिक खडतर असणार आहे. अमेरिकन ट्रेझरीने जवळपास २५ अब्ज डॉलरचा वित्त पुरवठा एअरलाईन कंपन्यांच्या मदतीसाठी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com