शेअर बाजारात जोरदार घसरण! सेन्सेक्स 1,024 अंकानी कोसळला

शेअर मार्केटमध्ये देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये शेवटच्या तासांमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली
Share Market down
Share Market downSakal

शेअर मार्केटमध्ये देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये शेवटच्या तासांमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दिवसभर घसरण सुरूच होती. शेअर बाजारातील (Share Market) दोन्ही निर्देशांक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी दिवसभर लाल चिन्हावर होता. त्यानंतर घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स १०२४ अंकावरन घसरून ५८ हजारांवर आला आणि ५७,६२१ च्या पातळीवर बंद झाला. तर, निफ्टी १७,३०० च्या खाली आला आणि ३०३ अंकाची जोरदार घसरण होऊन १७, २१३ वर बंद झाला.

Share Market down
वयाची 21 वर्ष पुर्ण झालीत? आज गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा फायदा

सेन्सेक्स १४०० अंकानी घसरला

याआधी बीएसईचा सेन्सेक्स ९२ अंकानी घसरून ५८,५५२ वर उघडला. तर निफ्टी २५ अंकाने घसरून १७,४९१ वर उघडला. व्यापार सुरू झाल्यावर त्यात घट होत होती. दुपारी अडीच दरम्यान सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरला तो आणखी घसरून तो 57,336 च्या पातळीवर गेला. त्यामुळे एका फटक्यात गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. व्यवहारादरम्यान एचडीएफसी बँक आणि एल अँड टीचे समभाग 3-3 टक्क्यांपर्यंत घसरले. सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 3 समभाग वधारत आहेत, तर 27 समभाग घसरणीत आहेत.

Share Market down
Share Market | 29 रुपयांच्या शेअरने केली कमाल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com