शेअर बाजारात घसरण सुरूच

Share-Market
Share-Market

मुंबई - जगभरात वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक अर्थव्यवस्था महामंदीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. भारतात देखील प्रसार वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी, भारतीय शेअर बाजारात गुरुवारी दिवसभर अस्थिरतेचे वातावरण होते. 

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५८१ अंशांच्या घसरणीसह २८ हजार २८८ अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात २०५ अंशांची घसरण झाली. तो ८ हजार २६३ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्‍सने आणि निफ्टीने अनुक्रमे २६ हजार ७१४ अंश आणि ७ हजार ८३२ अंशांची वर्षभरातील नीचांकी पातळी गाठली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना ‘एजीआर’ संबंधित थकीत रक्कम भरण्याबाबत फटकारले त्याचेही पडसाद गुरुवारी बाजारात उमटले. सकाळच्या सत्रात बाजार उघडताच सेन्सेक्‍समध्ये १७०० अंशांची तर निफ्टीमध्ये ५०० अंशांची घसरण झाली. बुधवारी सेन्सेक्‍स गेल्या तीन वर्षांत प्रथमच २९ हजार अंशांखाली आला. 

जागतिक पातळीवर अनेक देशांमधील मध्यवर्ती बॅंका आणि सरकारांनी आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी ‘पॅकेज’ जाहीर केली आहे. मात्र, तरीही जागतिक महामंदी सुरू होण्याची भीती भारतीय बाजारांवर दिसून आला. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून त्यांनी पैसे काढण्याचा सपाटा लावला होता. 

बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक १० टक्‍क्‍यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ ॲक्‍सिस बॅंक, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा आणि ओएनजीसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर आयटीसी, भारती एअरटेल, कोटक बॅंक आणि हिरो मोटो कॉर्पचे वधारून बंद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com