2022 चा सुपरस्टार होण्याची 'या' स्टॉकमध्येही क्षमता! | stock potential to be the superstar of 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCL Products India Limited for 2022

शेअर बाजार तज्ज्ञ अविनाश गोरक्षकर यांनी सीसीएल प्रॉडक्‍ट्समध्ये (CCL Products India Limited) 2022 साठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

2022 चा सुपरस्टार होण्याची 'या' स्टॉकमध्येही क्षमता !

Superstar Stocks: तुम्हाला नवीन वर्षात पोर्टफोलिओमध्ये मजबूत फंडामेंटल्स असलेला स्टॉक समाविष्ट करायचा असेल, तर सीसीएल प्रॉडक्ट्स (CCL Products India Limited) हा एक चांगला पर्याय असू शकतो. कन्सोलिडेटेड कॉफी प्रॉडक्ट्स लिमिटेड (CCL) ही ग्राहक क्षेत्रातील सर्वात मोठी इन्स्टंट कॉफी उत्पादक कंपनी आहे. शेअर बाजार तज्ज्ञ अविनाश गोरक्षकर यांनी CCL प्रॉडक्ट्समध्ये 2022 साठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. गोरक्षकर यांनी 510 - 515 रुपयांच्या टारगेट निश्चित केले आहे.

हेही वाचा: Petrol Diesel Price Today :पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर! जाणून घ्या आजची किंमत

सीसीएल प्रॉडक्ट्सचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा सुमारे 10 टक्के आहे. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे ते सुमारे 200 पद्धतीचे कॉफी ब्लेंड्स करते. युरोप, अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रॉडक्सचा पुरवठा करते. अलीकडे सीसीएल प्रोडक्‍ट्सने भारतात B2B कस्‍टमर पुरवठा सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय उत्तम प्रकारे सुरू आहे. पुढे कंपनी स्वतःचा ब्रँड लॉन्च करणार आहे.

- महसूल

गेल्या वर्षी कंपनीचा महसूल 1,240 कोटी रुपये होता. यात 300 कोटींचा कार्यरत नफा आणि 180 कोटींचा निव्वळ नफा आहे. सीसीएल प्रॉडक्ट्सचे शेअर्समध्ये 510-515 रुपयांचे टारगेट सहज पार करेल असा विश्वास आहे. त्यामुळेच आता हे शेअर्स खरेदी करुन आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्याचा सल्ला गोरक्षकर यांनी दिला आहे.

हेही वाचा: Big Scam : शेअर बाजारातील ५ मोठे घोटोळे, कोट्यावधींची अफरातफर

- कमीत कमी 17 टक्के रिटर्न निश्चित

2021 मधील सीसीएल प्रॉडक्ट्सचा रिटर्न चार्ट पाहिला तर आतापर्यंत त्याक 64 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या शेअरने वर्षभरात 494 रुपयांची सर्वोच्च पातळीही गाठली. 29 डिसेंबर 2021 ला या शेअरची किंमत 440 रुपये होती. म्हणजेच, गुंतवणूकदारांना 2022 मध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 17 टक्के परतावा मिळू शकतो असा विश्वास त्यांना आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Stock Market Expert Avinash Gorakshkar Recommends Investing In Ccl Products India Limited For 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top