Big Scam : शेअर बाजारातील ५ मोठे घोटोळे, कोट्यावधींची अफरातफर

Big Scam :  शेअर बाजारातील ५ मोठे घोटोळे, कोट्यावधींची अफरातफर

प्रत्येकालाच कोट्यधीश व्हायचंय, कमी मेहनत पण अमाप पैसा(Money) कमवायचा आहे. पण प्रत्येकाचेच भरपूर पैसे कमावण्याचे स्वप्न पूर्ण होतंच असे नाही. मग यातून जन्माला येतात घोटाळे. सध्या शेअर बाजाराचे (Share Market)फॅड वाढत चालले आहे. दुसरीकडे क्रिप्टोकरंसी, बिटकॉईन यांनीही धुमाकूळ घातलाय. पण यातूनच कोट्यावधींचे स्कॅम्स (Scam) आणि घोटाळ्यांचा (Fraud) जन्म झालाय असे म्हटले तर खोटं वाटू नये. आज आपण अशाच काही घोटाळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत. (5 big scams in the stock market fraud of crores )

Big Scam :  शेअर बाजारातील ५ मोठे घोटोळे, कोट्यावधींची अफरातफर
२०२१ मधील टॉप युनिकॉर्न गुंतवणूकदार कोण?

1) टीव्ही माध्यमांचा वापर करून कोण कसा फायदा उचलेल हे सांगता येत नाही. याच अत्यंत प्रभावशाली टीव्ही माध्यमाचा फायदा उचलत थेट मोठा घोटाळा केला गेला आणि अनेकांची मोठी फसवणूक करण्यात आली.

सीएनबीसीच्या 'Stock 20-20' शोचे अँकर हेमंत घई यांनी कोट्यवधींचा फ्रॉड केला, आणि स्वतः त्यातून जवळपास 3 कोटी कमावले. कसे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का ? तर हेमंत घई यांचा सीएनबीसी चॅनेलवर दररोज 'Stock 20-20' शो असायचा. त्यांचा शो बघणाऱ्या आणि त्यांच्या सल्ल्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकालाच घई फसवत होते. हेमंत घई रोज सकाळी गुंतवणूकदारांना सांगायचे की तुम्ही हे शेअर्स घ्या, जे तुम्हाला घसघशीत कमाई करुन देतील. आणि ज्या सकाळी ते हा सल्ला द्यायचे त्याच्या आदल्या दिवशी ते शेअर्स स्वतः विकत घ्यायचे. जेव्हा शोचे प्रेक्षक त्यांच्या शिफारसीनुसार शेअर्स खरेदी करायचे तेव्हा शेअरची किंमत वाढायची. मग हेमंत घई ते शेअर विकून टाकायचे. कधीकधी तर याच्या उलट करायचे. एखादा शेअर आता विकला तर फायदा होईल, उद्या हा शेअर पडू शकतो असे म्हणायचे, मग त्यांच्या प्रेक्षकांनी असे शेअर्स विकले की त्या शेअर्सचे दर पडायचे, आणि मग घई कमी किंमतीत शेअर्स विकत घेऊन स्वतःचा फायदा करुन घ्यायचे. याचाच अर्थ हेमंत घई आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा शो पाहणाऱ्या आणि त्यांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला अडकवायचे.

पण अखेर त्यांची ही फसवणूक समोर आलीच. सेबीने शोचे अँकर हेमंत घई यांना फ्रंट रनिंग प्रकरणात शेअर्स विकून कमावलेले 2.95 कोटी रुपये परत करण्यास सांगितले. सोबतच हेमंत घई स्वतः, त्यांची आई आणि पत्नी यांनाही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Big Scam :  शेअर बाजारातील ५ मोठे घोटोळे, कोट्यावधींची अफरातफर
क्रिप्टोकरन्सीचा ग्राहक संरक्षणाला धोका; रिझर्व्ह बँकेचा इशारा

2) कर्नाटकातील कथित बिटकॉइन घोटाळ्याने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. घोटाळेबाजाला पकडले होते ड्रग्ज प्रकरणात पण नंतर नंतर त्याने जे सांगितले ते हैराण करणारे आहे. या सगळ्यात देशातील भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी खडाजंगी झाली. काय आहे हे संपुर्ण प्रकरण पाहुयात.

श्रीकृष्ण नावाच्या व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्याच्याकडून 500 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला होता पण त्याची चौकशी सुरु असताना पोलिस चांगलेच चक्रावले. यावेळी त्याने अनेक क्रिप्टो वेबसाइट हॅक केल्याचे कबूल केले. क्रिप्टो हॅक करुन त्याने 9 कोटी रुपये कमावल्याचे सांगितले.

"बिटफाइनेक्स (Bitfinex) हा श्रीकृष्णचा पहिला मोठा बिटकॉइन एक्सचेंज हॅक होता. स्टॉक एक्स्चेंज दोनदा हॅक करण्यात आले होते आणि असे करणारा तो पहिलाच होता. श्रीकृष्णने डेटा सेंटरमधील बगचा फायदा घेतला ज्याने त्याला KVM (कर्नल-आधारित व्हर्च्युअल मशीन) सर्व्हरवर प्रवेश दिला. नंतर त्याने GRUB मोडमध्ये सर्व्हर रीबूट केला, मग रूट पासवर्ड रीसेट केला, त्यानंतर लॉगिन आणि पैसे काढण्याचा सर्व्हर पासवर्ड रीसेट केला आणि बिटकॉइनद्वारे स्वतःच्या बिटकॉइन पत्त्यावर पैसे पाठवले.

श्रीकृष्णने सांगितले की या हॅकिंगद्वारे त्याला सुमारे 20008 BTC (Bitcoin) चा फायदा झाला. जेव्हा त्याने बिटकॉइन्स हॅक केले तेव्हा एका बिटकॉइनची किंमत 100 ते 200 यूएस डॉलर्स दरम्यान होती. म्हणजेच त्याने तब्बल 9 कोटी रुपये धोक्याने कमावले. पण यातील एकही पैसा त्याने वाचवला नाही. महागडी दारू, ड्रग्स आणि महागड्या हॉटेल्सवर ही रक्कम दररोज खर्च केली. एका दिवसात तो 1 ते 3 लाख रुपये खर्च करत होता.

या प्रकरणी ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला असून नुकतीच त्याची चौकशीही करण्यात आली.

Big Scam :  शेअर बाजारातील ५ मोठे घोटोळे, कोट्यावधींची अफरातफर
नवीन वर्षात बदलताहेत 'हे' तीन नियम! दुर्लक्ष कराल तर पडेल महागात

3) भारतीयांसाठी टाटा (tata) नाव म्हणजे भरवसा, पण याच नावाचा फायदा घेऊन कुणी घोटाळा केला नाही असं होऊ शकत नाही. या आधीही टाटांच्या ब्रॅण्डनेमचा फायदा उचलून घोटाळे झाले असतील. मात्र यंदा tata हे नाव वापरून थेट क्रिप्टो घोटाळा झाल्याचे समजतंय. काही महिन्यांपूर्वी, टाटा सन्सने $टाटा नावाने crypto टोकन फ्लोट करणाऱ्या यूके आणि यूएस मधील दोन कंपन्यांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी टाटा ब्रँडचा वापर केला जात असल्याचं या,मध्ये नमूद केलं गेलं. या प्रकरणातील एका आरोपीने एक वेबसाइट चालवली. ज्याचं नाव होतं Hakunamatata.finance ज्यात शेवटी “टाटा” हे शब्द वापरले गेले होते, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या एक बातमीत नमूद करण्यात आलं आहे.

टाटा सन्सने कोर्टात युक्तिवाद केला की या कंपन्या मुद्दाम भारतीय नागरिकांना लक्ष्य करत आहेत मात्र न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला. याचं कारण म्हणजे टाटा सन्स पुराव्यांद्वारे ही बाब सिद्ध करू शकली नाही की, थेट कायद्यानुसार, भारतीय ग्राहकांनाच लक्ष्य करण्याचा यामध्ये हेतू आहे.

दरम्यान काही गुंतवणूकदारांनी अशाप्रकारच्या बातम्यांनंतर टाटा कॉईनमधील त्यांची गुंतवणूक 90% ने कमी झाल्याचे नोंदवले आहे.

सध्या भारतात क्रिप्टो करन्सी बाबत प्रचंड उत्सुकता निर्माण होतेय, मात्र यातील अनेक करन्सी या फेक असून केवळ गुंतवणूकदारांना लुबाडण्याच्या हेतूने तयार केलेल्या असू शकतात. टाटा या ब्रॅंडचा वापर करून नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न केला गेला असं म्हंटल तर काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे अशा स्कॅम्सपासून दूर राहा.

Big Scam :  शेअर बाजारातील ५ मोठे घोटोळे, कोट्यावधींची अफरातफर
Petrol Diesel Price Today :पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर! जाणून घ्या आजची किंमत

4) 2021 मध्ये जगभरात चिंता वाढवली ती म्हणजे ransomwear अटॅक्सने. भारतातही मोठ्या प्रमाणात असे सायबर अटॅक्स करण्याचा प्रयत्न झाला, अनेकदा आपल्याला बातम्यांमधून अशा प्रकारचा मोठा सायबर हल्ला होऊ शकतो याबाबत माहितीही देण्यात आली.

एक इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार 2021 मध्ये भारतात सर्वाधिक ransomeware हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. एकाच आठवड्यात भारतात तब्बल 213 अशा प्रकारचे सायबर हल्ले करण्यात आले.

Ransomeware हल्ला म्हणजे नेमकं काय? तर सायबर हल्लेखोरांकडून तुम्ही वापर असलेल्या crak सॉफ्टवेअर व्हर्जन्स किंवा तुमच्या महत्त्वाच्या डेटामध्ये एन्ट्री मिळवणं, यानंतर तुमचा सर्व महत्त्वाचा डेटा हा एका वेगळ्या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट केला जातो. यानंतर तुम्ही तुमचा कोणताही डेटा वापरू शकता नाही. मग तुमच्या डेटाला पूर्ववत करण्यासाठी तुमच्याकडूनच खंडणी गोळा केली जाते. यासाठी तुमच्याकडून अगदी 100 डॉलर्स ते हजारो डॉलर्स देखील मागितले जाऊ शकतात. धक्कादायक बाब म्हणजे तुम्ही पैसे दिल्यानंतरही 95 टक्के तुमचा डेटा रिकव्हर होत नाही.

भारतातील बहुसंख्य बड्या कंपन्यांवर अशा प्रकारचे सायबर हल्ले झाल्याचं बोललं जातंय. समोर येणाऱ्या आकडेवारीत गेल्या वर्षभरात 76 टक्के कंपन्यांवर अशा प्रकारचा एकतरी हल्ला झाल्याचं समजतंय. अमेरिकेतील सेक्युरिटी फर्म crowdstrike च्या माहितीनुसार भारतात अशा प्रकारचे सर्वाधिक हल्ले करण्यात आले आणि 27 टक्के कंपन्यांनी यातून बाहेर येण्यासाठी पैसे देखील मोजले.

crowdstrike च्या मगितीनुसार भारतातील कंपन्यांनी तब्बल 5 लाख USD ते 10 लाख USD एवढी मोठी रक्कम खंडणी म्हणून अदा केली आहे

Big Scam :  शेअर बाजारातील ५ मोठे घोटोळे, कोट्यावधींची अफरातफर
न्यू इयरला सोनं-चांदी खरेदी करायचा विचार करताय? दरात झाली घट

5) अशीच एक घटना लंडनच्या डच बँकेतील... (Deutsche Bank) डच बँकेतील मौल्यवान धातूंचे माजी व्यापारी जेम्स व्होर्ली आणि सेड्रिक चानू 'स्पुफिंग'द्वारे कोट्यवधींचा गंडा घातला होता...

व्होर्ली आणि चानू, सोबतच इतर डच बँकेच्या व्यापार्‍यांसह, "स्पूफिंग" म्हणून ओळखल्या जाणार्‍या फसव्या व्यापार पद्धतीद्वारे अनेकांची फसवणूक केली. यामध्ये न्यूयॉर्क, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील एक्सचेंजेसवर बऱ्याच फसव्या मौल्यवान धातूच्या ऑर्डर्स देणे आणि ऑर्डर्स पुर्ण होण्याआधीच रद्द करणे असा एकूण खेळ सुरु होता.

व्होर्ले आणि चानू) यांनी अनेक फसवे आदेश दिले. पुरवठा आणि मागणीचे खोटे स्वरूप निर्माण करण्यासाठी आणि इतर व्यापार्‍यांना किंमती, प्रमाण आणि वेळेनुसार व्यवहार करायला प्रवृत्त करण्यासाठी फसवे आदेश दिले, अन्यथा त्या व्यापाऱ्यांनी व्यापर केलाच नसता.

पण कोणत्याही घोटाळ्याचा पर्दाफाश होतोच तसाच इथेही झाला. इलिनॉयच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्टमध्ये फेडरल ज्युरीने दोघांना दोषी ठरवल्यानंतर दोघांनाही प्रत्येकी एक वर्ष आणि एक दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो हे फक्त काही घोटाळे आहेत, पण असे दर दिवशी हजारोंनी घोटाळे होत असतात. पटकन पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही स्वतःच कधी एखाद्या फसवणुकीला बळी पडाल सांगता यायचे नाही, त्यामुळे बचके रेहना मेरे दोस्त !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com