
शेअर बाजार तज्ज्ञांच्या मदतीने काही शेअर्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांनी बजेटपुर्वी खरेदीसाठी दिले दोन स्टॉक्स
Stocks to Buy : अर्थसंकल्पापूर्वी (Budget) मजबूत कमाईसाठी तुम्ही चांगल्या शेअर्सच्या (Shares) शोधात असाल तर आम्ही शेअर बाजार तज्ज्ञांच्या मदतीने काही शेअर्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आयटी आणि सिमेंट क्षेत्रातील शेअर्स जोरदार कामगिरी करत असल्याचे शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन यांचे म्हणणे आहे. येत्या अर्थसंकल्पात सिमेंट क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले जाऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्यांनी सेल (SAIL) आणि पीएफसीच्या (PFC) शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. (Union Budget 2022 Live Updates)
हेही वाचा: बजेट 2022: 5G टेक्नोलॉजीच्या विकासावर असू शकते अर्थमंत्र्यांचे लक्ष
सेल (SAIL)
- सीएमपी (CMP) - 98.25 रुपये
- टारगेट (Target) - 105 रुपये
- स्टॉप लॉस (Stop Loss) - 95 रुपये
पीएफसी (PFC)
- सीएमपी (CMP) - 121.15 रुपये
- टारगेट (Target) - 130 रुपये
- स्टॉप लॉस (Stop Loss) - 117 रुपये
हेही वाचा: बजेट 2022 : कधी सादर होणार अर्थसंकल्प? जाणून महत्त्वाची माहिती
अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) उद्या अर्थात 1 फेब्रुवारी 2022 ला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस बजेटपुर्व खरेदीसाठी शेवटचा आहे. त्यामुळे चांगल्या कमाईसाठी शेअर बाजार तज्ज्ञांनी सेल (SAIL) आणि पीएफसी (PFC) हे दोन शेअर्स गुंतवणुकदारांनी घेण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन येत्या काळात त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Stock Market Expert Sanjeev Bhasin Has Given Two Stocks Cell And Pfc For Pre Budget Purchase
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..