Share Market Closing : सेन्सेक्सचा ऐतिहासिक विक्रम; प्रथमच 62,000 अंकांच्या वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stock market

Share Market Closing : सेन्सेक्सचा ऐतिहासिक विक्रम; प्रथमच 62,000 अंकांच्या वर

आज शेअर बाजार तेजीने उघडला. सेन्सेक्स 145 अंकांच्या तेजीने 61656 वर उघडला, निफ्टी 59 अंकांच्या तेजीने 18326 वर तर बँक निफ्टी 109 अंकांच्या तेजीने 42838 वर उघडला. बँक निफ्टी प्रथमच 42800 च्या वर उघडला. फेडरल रिझर्व्हच्या डॉलर निर्देशांक 106 च्या खाली घसरला, ज्यामुळे रुपयाला तेजी मिळाली. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांच्या वाढीसह 81.72 च्या पातळीवर उघडला.

आज शेअर बाजारात तेजी होती. त्यामुळे सेन्सेक्स आणि बँक निफ्टी उच्च पातळीवर बंद झाले. निफ्टी 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर बंद झाला. सेन्सेक्स 762 अंकांच्या वाढीसह 62272 वर बंद झाला. निफ्टी 216 अंकांच्या उसळीसह 18484 वर बंद झाला, जो 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. बँक निफ्टीने प्रथमच 43 हजार पार करून 43075 च्या पातळीवर बंद केला. व्यवहारादरम्यान तो 43163 च्या पातळीवर पोहोचला होता.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

शेअर बाजारातील बँकिंग, आयटी, एफएमसीजी, एनर्जी, मेटल, इन्फ्रा या सर्व क्षेत्रांतील शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. पण बँक निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. बँक निफ्टीने प्रथमच 43000 पार करून 43075 वर बंद केला. त्यामुळे आयटी समभागातील मोठ्या तेजीमुळे निफ्टी आयटी 773 अंकांच्या उसळीसह 30,178 अंकांवर बंद झाला आहे.

केवळ ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राच्या समभागात घसरण दिसून आली. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 43 समभाग वाढीसह बंद झाले, तर केवळ 7 समभाग घसरले. तर सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 26 समभाग वाढीसह आणि चार लाल रंगात बंद झाले.

हेही वाचा: Job Cuts :आर्थिक मंदीचा मीडिया कंपन्यांना फटका; कर्मचारी कपातीचे मोठे संकट

बाजार विक्रमी उच्चांकावर बंद झाला तेव्हा, जर आपण तेजी मिळवलेल्या समभागांवर नजर टाकली तर, इन्फोसिस 2.93%, HCL टेक 2.59%, पॉवर ग्रिड 2.56%, विप्रो 2.43%, टेक महिंद्रा 2.39%, TCS 2.05%, HDFC 1.99%, एचयूएल 1.69 टक्के, एचडीएफसी बँक 1.68 टक्के, सन फार्मा 1.58 टक्के वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी टाटा स्टील 0.14 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.11 टक्के, बजाज फायनान्स 0.10 टक्के, कोटक महिंद्रा 0.09 टक्के असे केवळ चार समभाग घसरले.