Share Market Opening : बाजारात घसरण सुरूच; टाटांच्या 'या' शेअर्समध्ये तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market Opening : बाजारात घसरण सुरूच; टाटांच्या 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Opening : सेन्सेक्स 115 अंकांच्या घसरणीसह 60811 वर तर निफ्टी 47 अंकांच्या घसरणीसह 18084 वर उघडला. बँक निफ्टीने 126 अंकांची घसरण नोंदवली आणि तो 42733 स्तरावर उघडला. बाजारात अस्थिरता दिसून येत आहे.

आयटी, पीएसयू बँका आणि धातूंमध्ये घसरण दिसून येत आहे. सध्या सर्वात मोठी घसरण इन्फोसिस, बजाज फायनान्शिअल सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजी, टीसीएस आणि विप्रोच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. पॉवरग्रिड, टायटन, एनटीपीसी आणि एशियनपेंट्स सारखे शेअर्स वाढले आहेत.

सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सची स्थिती :

सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 समभाग घसरणीसह आणि उर्वरित 14 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 पैकी 17 समभागांमध्ये घसरण झाली.

BSE India

BSE India

कोणते स्टॉक तेजीत आहेत :

सेन्सेक्स समभागांवर नजर टाकली तर आज पॉवरग्रीड, एनटीपीसी, टायटन, एशियन पेंट्स, एचडीएफसी, एम अँड एम, इंडसइंड बँक, एल अँड टी, सन फार्मा, मारुती आणि बजाज फायनान्स तेजीसह व्यवहार करत आहेत.

कोणते स्टॉक घसरत आहेत :

जर तुम्ही निफ्टीच्या पहिल्या पाच घसरलेल्या समभागांवर नजर टाकली तर ओएनजीसी, टीसीएस, इन्फोसिस, बीपीसीएल आणि बजाज फिनसर्व्ह 0.90 ते 0.75 टक्क्यांच्या दरम्यान घसरताना दिसत आहेत.

कोविड-19 मुळे आशियाई शेअर बाजार खाली आला, चीनने अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी नवीन निर्बंध लादले आहेत. अशा स्थितीत दिशा न मिळाल्याने बुधवारी आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली.

आज या शेअर्समध्ये तेजी दिसून येऊ शकते :

हिन्दाल्को (HINDALCO), टाटा स्टील (TATASTEEL), जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL), टाटा मोटर्स (TATAMOTORS), ओएनजीसी (ONGC), झिंदाल स्टील (JINDALSTEL), डिक्सन (DIXON), टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR), पर्सिस्टंट (PERSISTENT), श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SHRIRAMFIN)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.