esakal | Stock Market: सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उंचीवर; गुंतवणुकदारांची झाली चांदी
sakal

बोलून बातमी शोधा

Sensex_

ग्लोबल मार्केटमधून मिळालेल्या संकेतामुळे सोमवारी शेअर बाजाराने इतिहास रचला.

Stock Market: सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उंचीवर; गुंतवणुकदारांची झाली चांदी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- ग्लोबल मार्केटमधून मिळालेल्या संकेतामुळे सोमवारी शेअर बाजाराने इतिहास रचला. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उंचीवर पोहोचले. पीएसईचा 30 शेअर्संचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) पहिल्यांदाच 49,200 च्या पार गेला. तर निफ्टी50 14,474 च्या रिकॉर्ड हाय स्तरावर पोहोचला. एफएमसीजी, आयटी, ऑटो आणि फायनेंशियल शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. भारतातील बीएसई लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप 197 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. गुंतवणुकदारांना आज 1.33 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. 

चीनमुळं काही अडणार नाही; भारतातच सापडला मौल्यवान खनिज साठा

आज मोठ्या शेअर्ससोबत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची खरेदी पाहायला मिळाली. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 0.17 टक्क्यांनी वाढला आहे. स्मॉलकॅप इंडेक्समध्येही तेजी आली आहे. बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 1.46 टक्क्यांनी व्यवहार करत आहे. मागील आठवड्यात 30 शेअर्सच्या इंडेक्स सेन्सेक्समध्ये 900 अंकानी वाढ झाली होती आणि टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1.37 लाख कोटींची तेजी आली होती. सर्वात जास्त फायदा टाटा ग्रुपची आयटी कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्विसेसला (TCS) झाला.

BSE लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप 197 लाख कोटी रुपयांच्या पार

स्टॉक मार्केटमध्ये रिकॉर्ड तेजीसोबत गुंतवणुकदारांची चांदी झाली आहे. बाजारात बीएसई लिस्टेड कंपन्यांचा (BSE-listed companies) मार्केट कॅप 197 लाख कोटी रुपयांच्या पार गेला आहे. आज सेंसेक्सने 400 अंकांनी उसळी घेतली आहे. शेअर्समध्ये बीएसई लिस्टेड कंपन्यांचा एम कॅप रिकॉर्ड स्तरापर्यंत पोहोचला आहे.  

कोरोनाचा नवा स्ट्रेन आता रशियात; तर चीनमध्ये गेल्या 5 महिन्यातील सर्वधिक...

गुंतवणुकदारांचा 1.33 लाख कोटी रुपयांचा फायदा

बाजारातील तेजीमुळे सोमवारी गुंतवणुकदारांना चांगला फायदा झाला. काही मिनिटाच्या व्यवहारात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी बीएसई लिस्टिड कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप 1,95,66,343.57  कोटी रुपये होता, जो आज 1,33,819.57 कोटी रुपयांनी वाढून 1,97,00,163.14 कोटी रुपये झाला आहे. 

loading image
go to top