esakal | चीनमुळं काही अडणार नाही; भारतातच सापडला मौल्यवान खनिज साठा
sakal

बोलून बातमी शोधा

lithium

भारत लिथियमबाबत (Lithium) चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात आहे

चीनमुळं काही अडणार नाही; भारतातच सापडला मौल्यवान खनिज साठा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

बंगळुरु- भारत लिथियमबाबत (Lithium) चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचमुळे भारताने अर्जेंटिनाच्या कंपनीसोबत करार (India Argentina agreement for lithium) केला आहे. आतापर्यंत चीनकडून मोठ्या प्रमाणात लिथियमची आयात करण्यात आली आहे. त्यातच आता कर्नाटकमध्ये लिथियमचे मोठे साठे सापडले आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बॅटरीच्या वापरासाठी लिथियमचा वापर होतो. 

कोरोनाचा नवा स्ट्रेन आता रशियात; तर चीनमध्ये गेल्या 5 महिन्यातील सर्वधिक...

बेंगळुरुपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर मांड्यामध्ये लिथियमचे साठे सापडले आहेत. त्यामुळे देशात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढण्यासाठी मोठी मदत मिळू शकते. वैज्ञानिकांच्या अनुमानानुसार हे साठे 16000 टन असू शकतात. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधातील वृत्त दिलं आहे. 

दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतात सापडलेले लिथियमचे साठे कमी आहेत. चिलीमध्ये 86 लाख टन, ऑस्ट्रेलियामध्ये 28 लाख टन, अर्जेंटिनामध्ये 17 लाख टन, पोर्तुगालमध्ये 60 हजार टन लिथियमचे साठे आहेत. त्या तुलनेत भारतातील 14,100 टन लिथियमचे साठे खूप कमी आहेत. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ साईन्समधील प्रोफेसर आणि बॅटरी टेक्नॉलोजीचे एक्सपर्ट मुनिचंद्रइया यांनी सांगितलं की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मांड्याच्या 5 किलोमीटर परिसरात जवळपास 30,300 टन एलआय20 उपलब्ध असण्याची शक्यता आहे, ज्यात लिथियम मेटल जवळपास 14,100 टनच्या बरोबर आहे. 

तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून एकीवर अत्याचार ! संशयिताला "अशी' केली...

काय आहे लिथियम

लिथियम एक रासायनिक पदार्थ आहे, ज्याला हलक्या धातुंच्या श्रेणीमध्ये ठेवलं जातं. धातू असूनही याला चाकू किंवा टोकदार वस्तूने सहजपणे कापले जाऊ शकते. या पदार्थापासून बनवलेली बॅटरी हलकी आणि रिचार्ज करण्यास सोपी असते. लिथियमचा वापर रिचार्जेबल बॅटेरिंमध्ये होतो आणि या क्षेत्रात चीनचा मोठा दबदबा आहे. पण आता अर्जेटिनाच्या कंपनीसोबत करार करुन भारताने चीनचा दबदबा तोडण्याचा प्रयत्न केला आहे. 

भारत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लिथियमची आयात करतो. मागील वर्षी भारताने 1.2 अब्ज डॉलर किंमतीचे लिथियम आयात केले आहे. भारताला आपली उर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी लिथियमची आवश्यकता आहे. भारतात लिथियमच्या शोधासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. भारतात लिथियमचे किती साठे आहेत, याची निश्चित माहिती नाही. भारत चिली आणि बोलिविया या देशांसोबतही लिथियमसाठी करार करण्याचा विचार करत आहे. 
 

loading image
go to top