शेअर बाजारात तेजीचे वारे

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्यात सिंगापूर येथे झालेल्या ऐतिहासिक बैठकीचे सकारात्मक पडसाद मंगळवारी जगभरातील शेअर बाजारांत उमटले. भारतासह आशियातील सर्वच बाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिले. या लाटेत सेन्सेक्‍सने चार महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. 

सेन्सेक्‍स दिवसअखेर २०९ अंशांनी वधारून ३५ हजार ६९२ अंशांवर बंद झाला; तर निफ्टी ५५.९० अंशांच्या वाढीसह १० हजार ८४२ अंशांवर स्थिरावला. बाजारात ब्लुचिप श्रेणीतील शेअर्सला मागणी होती. भारती एअरटेल, टाटा स्टील आदी शेअर्समध्ये नफावसुलीचा फटका बसला. सेन्सेक्‍सची १ फेब्रुवारीनंतरची उच्चांकी पातळी ठरली. जपानच्या निक्केई, 

शांघाय आणि हाँगकाँग शेअर बाजाराचे निर्देशांक तेजीसह बंद झाले. युरोपातील प्रमुख बाजारांनी सकारात्मक सुरुवात केली होती.

Web Title: Stock markets rally fastest