अदर पूनावालांनी केली 118 कोटींची फायद्याची डील

adar-poonawalla
adar-poonawallae sakal

Adar Poonawalla News: सीरम इंडिया इन्स्टिट्यूटचे (SII) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. पॅनासिया बायोटेक (Panacea Biotec) चे सर्व शेअर्स विकून ते भारतीय बायोटेक्नोलॉजी कंपनी पॅनासिया बायोटेकमधून बाहेर पडले आहेत. या कंपनीत पूनावाला यांची वैयक्तिक 5.15 टक्के हिस्सेदारी होती. पीटीआयच्या वृत्तानुसार, खुल्या बाजारात त्यांनी विकलेले संपूर्ण शेअर्स सीरम इंडिया इन्स्टिट्यूटने जवळपास 118 कोटी रुपयांना खरेदी केले.

adar-poonawalla
भारतातील टॉप 10 अब्जाधीश; पूनावाला यांच्या संपत्तीत वाढ

373.85 रुपये प्रति शेयर मिळाली किंमत (373.85 per share sold)

मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, पूनावाला यांनी पॅनासियाचे 31,57,034 शेअर्स 373.85 रुपये प्रति शेअर्स दराने विकले. यात त्यांना 118.02 कोटी मिळाले. हे सर्व शेअर्स वेगळ्या डीलमध्ये सीरम इंडिया इन्स्टिट्यूटनेच खरेदी केले.

पूनावाला आणि एसआयआय शेअर्स (Poonawala and SII shares)

पॅनासियाच्या मार्च 2021 च्या शेअर्स होल्डिंग आकडेवारीनुसार, पूनावाला (Adar Poonawalla) आणि एसआयआय (Serum Institute of India) कंपनीने अनुक्रमे 5.15 टक्के आणि 4.98 टक्के शेअर्स खरेदी केले होते. पूनावालांनी आपले सर्व शेअर्स विकल्यानंतर आता हे सर्व शेअर्स कंपनीच्या नावे झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com