esakal | Share Market: लॉकडाऊनची भीती? शेअर मार्केट 1700 अंकांनी घसरला
sakal

बोलून बातमी शोधा

share_20market

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याचा प्रभाव शेअर मार्केटवरही पडल्याचं पाहायला मिळालं

Share Market: लॉकडाऊनची भीती? शेअर मार्केट 1700 अंकांनी घसरला

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याचा प्रभाव शेअर मार्केटवरही पडल्याचं पाहायला मिळालं. लोकांमध्ये असलेल्या भीतीमुळे सोमवारी शेअर मार्केट सुरु होताच मोठी घसरण  (stock market saw a big fall) पाहायला मिलाली. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लॉकडाऊनच्या भीतीने शेअर मार्केट दिवसभरात 1700 अंकानी घसरला. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रिज सारख्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे सेन्सेक्स 1629.14 अंक म्हणजे 3.29 टक्क्यांनी घसरत 47,961 च्या स्तरावर व्यवसाय करत होता. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी बीएसईचे सेन्सेक्स सकाळी 805.29 अकांनी घसरत 48,786.03  स्तरावर व्यवसाय करत होता. निफ्टी 268.05 अंक म्हणजे 1.81 अंकांच्या घसरणीसह  14,566.80 स्तरावर ट्रेंड करत होता. सेन्सेक्समध्ये इंफोसिस सोडून सर्व शेअर लाल चिन्हासह व्यवसाय करत होते. 

कोरोनाकाळात वाढलं ‘मेडिक्लेम’चं महत्त्व!

सेन्सेक्समध्ये सर्वाधिक आठ टक्क्यांची घट इंडसइंड बँकेमध्ये झाली. बजाज फायनेन्स, अल्ट्राटेक सीमेंट, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एलएन्डटी, सन फार्मा, हिंदुस्तान यूनिलीवर, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डीज आणि एचडीएफसी बँकेचे शेअर नुकसानमध्ये आहेत. दुसरीकडे फक्त इंफोसिस हिरव्या चिन्हासह व्यवसाय करत आहे.

पुन्हा ‘लॉकडाउन’? पुन्हा शेअर खरेदीची संधी?

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरी लाट अधिक गंभीर असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि शेअर मार्केटमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला असून स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये नकारात्मक हालचाल पाहायला मिळाली.

loading image
go to top