esakal | कोरोनाकाळात वाढलं ‘मेडिक्लेम’चं महत्त्व!
sakal

बोलून बातमी शोधा

Mediclaim

बेसिक मेडिक्लेम पॉलिसी आणि सुपर टॉप-अप पॉलिसीची व्यवस्थित सांगड घातली तर १० ते १५ हजार रुपयांच्या वार्षिक हप्त्यच्या रकमेत १ कोटी रुपयांपर्यंतचा ‘मेडिक्लेम’ सहज मिळू शकतो.

कोरोनाकाळात वाढलं ‘मेडिक्लेम’चं महत्त्व!

sakal_logo
By
प्रवीण कुलकर्णी

पुणे : कोविड-१९ सारखे अचानक उद्भवणारे संसर्गजन्य आजार किंवा अपघातामुळे अनपेक्षितपणे येणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून संरक्षण म्हणून आरोग्यविमा किंवा ‘मेडिक्लेम’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याशिवाय, आजारपण, नियोजित शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा काही प्रमाणात कॉस्मेटिक उपचारांसाठी देखील आरोग्य विमा अतिशय महत्त्वाचा आहे. सध्याच्या काळात तर याचे महत्त्व अधिकच वाढल्याचे दिसून येते.

‘मेडिक्लेम’ गरजेचा का आहे?

एकीकडे वाढता वैद्यकीय खर्च आणि दुसरीकडे उत्पन्न किंवा नोकरीची शाश्वती कमी होत असताना, अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून संरक्षण म्हणून ‘मेडिक्लेम’ गरजेचा आहे. वैद्यकीय खर्चामुळे येणारा मानसिक ताण अपरिहार्य असताना पैशांची तजवीज करण्यासाठी वर्षानुवर्षे केलेली बचत किंवा दागिने मोडण्याची अथवा कर्ज काढण्याची किंवा इतरांकडे मदत मागण्याची वेळ येऊ नये, यासाठी ‘मेडिक्लेम’ आवश्यक आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; DA मध्ये होणार वाढ​

‘मेडिक्लेम’मध्ये कोणते आजार?

न्यूमोनिया, टायफॉईड, चिकन गुनिया सारखे हंगामी आजार ते मोतीबिंदू, हार्निया, मुतखडा, अपेंडिक्स, मूळव्याधीपासून कॅन्सर, हृदय शस्त्रक्रिया ते अगदी स्किझोफ्रेनिया सारख्या मानसिक आजारांचा ‘मेडिक्लेम’मध्ये समावेश होतो. ‘मेडिक्लेम’अंतर्गत उपचारासाठी येणारा खर्च विमा कंपनीकडून ‘कॅशलेस’ अथवा अगोदर स्वतः पैसे भरून मग उपचाराची कागदपत्रे विमा कंपनीकडे दाखल करून ‘रिएम्बर्समेंट’ स्वरूपात परत मिळविता येतो.

‘मेडिक्लेम’मध्ये कोणते खर्च मिळतात?

रुग्णालयातील खोलीचे भाडे, नर्सिंग चार्जेस, शस्त्रक्रिया; तसेच डॉक्टरांच्या तपासणी फी यापासून ते सोनोग्राफी, रक्त-लघवी तपासणी खर्च, सिटी स्कॅन, औषधांचा खर्च, अँब्युलन्स अशा आणि इतर विविध खर्चांचा ‘मेडिक्लेम’मध्ये समावेश असतो.

‘पीपीएफ’कडे आजच लक्ष का द्यायला हवे?​

१० हजारांच्या हप्त्यात १ कोटीचा ‘मेडिक्लेम’!

बेसिक मेडिक्लेम पॉलिसी आणि सुपर टॉप-अप पॉलिसीची व्यवस्थित सांगड घातली तर १० ते १५ हजार रुपयांच्या वार्षिक हप्त्यच्या रकमेत १ कोटी रुपयांपर्यंतचा ‘मेडिक्लेम’ सहज मिळू शकतो. यामुळे एअर अँब्युलन्सपासून ते अगदी परदेशात जाऊन उपचार घेणेदेखील शक्य होऊ शकते. अर्थातच, वयानुसार हप्त्याच्या रकमेत बदल होतो.

‘मेडिक्लेम’ पॉलिसी घ्यायचीय?

आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता लक्षात घेऊन मेडिक्लेम पॉलिसी घेण्यासाठी www.sakalbima.com ला आजच भेट द्या आणि निश्चिंत व्हा. ‘सकाळ बिमा’च्या वेबसाईटवर देशातील आघाडीच्या विमा कंपन्यांच्या मेडिक्लेम पॉलिसी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ७३५०८ ७३५०८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. आमचे तज्ज्ञ विमा सल्लागार तुम्हाला संपर्क साधून योग्य विमा पॉलिसी घेण्यासाठी मदत करतील.

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top