Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

जोपर्यंत व्याजदरांबद्दलची चिंता कमी होत नाही तोपर्यंत निवडक शेअर्समध्येच पैसे गुंतवणे योग्य ठरेल
 Share Market
Share Market sakal

सोमवारी बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळाली. हेवीवेट तसेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. ऑटो, एफएमसीजी आणि मेटल शेअर्स वधारले. इन्फ्रा, एनर्जी आणि पीएसई शेअर्समध्येही वाढ दिसून आली पण आयटी आणि पीएसयू बँकिंग शेअर्स दबावाखाली  दिसले.

सेन्सेक्स 468 अंकांनी वाढून 61806 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 151 अंकांनी वाढून 18420 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 194 अंकांनी वाढून 43,414 वर बंद झाला. (pre analysis of share market update 20 December 2022 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

युरोपीय बाजारातील वाढ आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे भारतीय बाजारांचा मूडही सुधारल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. पण यूएस फेडकडून दरात आणखी वाढ होण्याच्या शक्यतेनंतर गुंतवणूकदार सावध दिसत आहेत.

 Share Market
Stock Split : दोन वर्षात 200% रिटर्न, 'या' कंपनीने केली शेअर्स स्टॉक स्प्लिटची घोषणा

अशा परिस्थितीत येत्या ट्रेडिंग सत्रात बाजारात आणखी चढ-उतार पाहायला मिळू शकतात. जोपर्यंत व्याजदरांबद्दलची चिंता कमी होत नाही तोपर्यंत निवडक शेअर्समध्येच पैसे गुंतवणे योग्य ठरेल असेही चौहान यांचे म्हणणे आहे.

तांत्रिक दृष्टीकोनातून, निफ्टीने 18250 स्तरावरून सपोर्ट घेत चांगली रिकव्हरी दाखवली. पण, त्याचे शॉर्ट टर्म फार्मेशन अजूनही नकारात्मक संकेत देत आहे.

 Share Market
Share Market : आज कोणते टॉप 10 शेअर्स करतील परफॉर्म?

आता जोपर्यंत निफ्टी 18300 ची पातळी होल्ड करण्यास सक्षम आहे तोपर्यंत पुलबॅकची शक्यता असेल. या पुलबॅकमध्ये, आपण निफ्टी 18550-18575 कडे म्हणजेच 20-दिवसांच्या SMA कडे जाताना पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी 18300 च्या खाली घसरला तर आपण 18200-18150 पातळी खाली पाहू शकतो.

 Share Market
Share Market : गुंतवणूकदारांची चांदी! फक्त 6 महिन्यात 'या' शेअरने 1 लाखाचे केले 45 लाख...

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
पॉवरग्रीड (POWERGRID)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
पेज इंडिया (PAGEIND)
एबीबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ABB)
झिंदाल स्टील (JINDALSTEL)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

 Share Market
Stock Market Investment : 'या' स्टॉकने गेल्या दोन वर्षात दिला तिप्पट रिटर्न...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com