esakal | Stock Tips: हमखास करायचीय कमाई ? किमान 40 टक्के नफा देणारे 'हे' स्टॉक्स...
sakal

बोलून बातमी शोधा

stock

अनेक कंपन्या पुढच्या 1 वर्षात उत्तम परतावा देऊ शकत असल्याचा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञ देत आहेत.

हमखास करायचीय कमाई ? किमान 40 टक्के नफा देणारे 'हे' स्टॉक्स...

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

Stock Tips Marathi: शेअर बाजारात गुंतवणूक करून प्रत्येकालाच चांगली कमाई करायची आहे, नाही का ? तुम्हालाही पुढील 1 वर्षात स्टॉकमध्ये गुंतवणूक करून 10 ते 40 टक्के परतावा मिळवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही शेअर्सद्दल सांगत आहोत. बेंचमार्क निर्देशांकांनी त्यांच्या विक्रमी मूल्यांकनातून (Record Valuation) लाईफचाईम उच्चांक गाठला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. पण येत्या 1 वर्षात कोणकोणत्या कंपन्या उत्तम परतावा देतील याचा अभ्यास शेअर बाजार तज्ज्ञांनी केलाय, कोणते आहेत हे शेअर्स पाहुयात...

क्राफ्ट्समॅन ऑटोमेशन | लक्ष्य: 2,430 रुपये

ऑटो अ‍ॅन्सिलरी कंपनी क्राफ्ट्समन ऑटोमेशनबाबत विश्लेषकांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. क्राफ्ट्समॅन ऑटोमेशन अ‍ॅल्युमिनियम ऑटोमोटिव्ह पॉवरट्रेनच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये मोडते. कंपनीच्या व्यवसायातील वाढ लक्षात घेता त्याचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. ऑटोमोटिव्ह आणि इंडस्ट्रिअल सेगमेंट्स येत्या काही दिवसांत भन्नाट तेजी नोंदवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: 'या' 4 स्पेशॅलिटी केमिकल्स स्टॉक्सना कोटक सिक्युरिटीजकडून खरेदी रेटिंग

हिमत्सिंग्का सीड | लक्ष्य: 373 रुपये

भारतातून कपड्यांची निर्यात सातत्याने वाढत आहे आणि जागतिक आर्थिक संकटानंतर कंपनी आपला व्यवसाय झपाट्याने विस्तारत आहे. ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. कंपनीच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे. पुढच्या दोन वर्षांसाठी कंपनीचा महसूल वार्षिक 30 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. येत्या काळात कर्ज कमी करण्यात आणि मार्जिन वाढवण्यात कंपनी यशस्वी होऊ शकते, असे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.

सुदर्शन केमिकल्स | लक्ष्य: 734 रुपये

सुदर्शन केमिकल्स ही रंगद्रव्ये (Pigment) तयार करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर जगातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे. जागतिक कंपन्या आता चीनबाहेर पर्याय शोधत असल्यामुळे सुदर्शन केमिकल्सच्या व्यवसायात चांगली वाढ होऊ शकते. कंपनीने 600 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची घोषणा केली आहे जी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुदर्शन केमिकल्सचे शेअर्स पुढील दोन तिमाहीत 734 रुपयांचे लक्ष्य साध्य करु शकते असे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.

हेही वाचा: शॉर्ट टर्मसाठीचे कमाल स्टॉक्स, टारगेट आणि स्टॉप लॉस किती ठेवावा?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top