बाजारातील तेजी कायम

बाजारातील तेजी कायम

नवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजी सोमवारी (ता. १८) सलग सहाव्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७० अंशांनी वधारून ३८ हजार ०९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ३५ अंशांची वाढ होत तो ११ हजार ४६२ अंशांवर स्थिरावला.

सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून देशाची व्यापारी तूट घटल्याचे स्पष्ट झाले असून, या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी आज खरेदीला प्राधान्य दिले. याबरोबरच परकी गुंतवणूदारांकडून सुरू असलेला ओघ कायम असल्याचे बाजारातील दलालांनी सांगितले. सेन्सेक्‍स मंचावर बजाज फायनान्सचा शेअर सर्वाधिक वधारला. पॉवर ग्रीड, रिलायन्स, ॲक्‍सिस बॅंक, टाटा स्टील, कोटक बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, सन फार्मा आदी शेअर तेजीत बंद झाले. मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल, एल अँड टी, वेदांता, बजाज ऑटो, एचसीएल, इन्फोसिस आदी शेअर घसरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com