नवी वाहनखरेदी मंदीमुळे थांबवाच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

 आरटीओचे विविध प्रकारचे वाढलेले शुल्क, इंधनाच्या दरात होत असलेली वाढ, विमा कंपन्यांच्या हप्त्यांत झालेली वाढ आणि मंदीसदृश परिस्थितीमुळे मालवाहतूकदारांनी नवी वाहनखरेदी करूच नये, असे आवाहन दी पूना डिस्ट्रिक्‍ट मोटार  गुड्‌स टान्स्पोर्ट असोसिएशनने एका निवेदनाद्वारे  सोमवारी केले.

पुणे - आरटीओचे विविध प्रकारचे वाढलेले शुल्क, इंधनाच्या दरात होत असलेली वाढ, विमा कंपन्यांच्या हप्त्यांत झालेली वाढ आणि मंदीसदृश परिस्थितीमुळे मालवाहतूकदारांनी नवी वाहनखरेदी करूच नये, असे आवाहन दी पूना डिस्ट्रिक्‍ट मोटार  गुड्‌स टान्स्पोर्ट असोसिएशनने एका निवेदनाद्वारे  सोमवारी केले.

नव्या वाहनांवर जीएसटी मोठ्या प्रमाणावर आकारला जातो. परमिट, लायसन्सचे नूतनीकरण तसेच पासिंग शुल्क आदी आरटीओ शुल्कात जबर वाढ झाली आहे. तसेच विमा कंपन्यांनीही हप्त्यांचे दर वाढविले आहेत. वाहनांचे सुटे भाग महाग झाले आहेत. इंधनाचे दर वाढतेच आहेत. बाजारपेठेतही मंदी आहे. त्यामुळे कर्ज काढून वाहनखरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना बॅंकांचे हप्ते भरणेही अवघड झाले आहे. मालवाहतूकदारांना काही सवलती द्याव्यात, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे करण्यात आली होती. परंतु, त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मालवाहतूक व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळेच मालवाहतुकीसाठी नवी वाहनखरेदी करू नका, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राम कदम आणि मानद सचिव राजेंद्र खेडेकर यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop buying a new vehicle