स्क्रीन शेअरिंग फ्रॅाड

सुधाकर कुलकर्णी 
Monday, 10 August 2020

ऑनलाईन फ्रॉडसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेणे आवश्‍यक आहे की, अशा बहुतांश फ्रॉडमध्ये ज्याची फसवणूक होते, त्या व्यक्तीची कळत-नकळत होणारी चूक कारणीभूत असते.

‘कोरोना’च्या साथीमुळे सामाजिक अंतर पाळण्याच्या उद्देशाने आजकाल ऑनलाईन बॅंकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. ही निश्‍चितच चांगली बाब आहे. मात्र, त्याचबरोबर ऑनलाईन फ्रॉडसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेणे आवश्‍यक आहे की, अशा बहुतांश फ्रॉडमध्ये ज्याची फसवणूक होते, त्या व्यक्तीची कळत-नकळत होणारी चूक (कधी अज्ञानातून तर कधी हव्यासापोटी) कारणीभूत असते. स्क्रीन शेअरिंग फ्रॉड हा एक बॅंकिंग फ्राँड असून, यात एक अनोळखी व्यक्ती आपण बॅंकेतून बोलत असल्याचे भासवते. ‘आपले ऑनलाईन बॅंकिंग व्यवहार आणखी सुलभ होण्यासाठी एक ॲप आपल्याला देऊ करीत आहोत व आपण ते आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या,’ असे सांगतो. आपण त्या व्यक्तीची शहानिशा न करता, केवळ ‘बॅंकेतून बोलतोय’ या सांगण्यावर विश्‍वास ठेवून त्याने सांगितलेले ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरे तर हे कोणतेच बॅंकिंग ॲप नसते. ते एक स्क्रीन शेअरिंग ॲप असते. ते डाउनलोड केले असता आपण ऑनलाईन बॅंकिंग व्यवहार करण्यासाठी जो आयडी, पासवर्ड, ओटीपी किंवा सीव्हीव्ही वापरतो, तोच सर्व तपशील ज्याने आपल्याला स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करायला सांगितले असते, त्याला शेअर केले जातात व याचा वापर करूत आपल्या बॅंक खात्यातील रक्कम आपल्या अपरोक्ष ट्रान्स्फर केली जाते. क्रेडीट वा डेबिट कार्डचा फ्राँड याच पद्धतीने केला जातो. सर्व तपशील बरोबर असल्याने हा व्यवहार तात्काळ पूर्ण होतो व खात्यातून रक्कम ‘डेबिट’ झाल्याचा ‘एसएमएस’ आल्यावर आपल्याला कळते. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून स्क्रीन शेअर, एनीडेस्क, व टीम व्ह्यूअर या नावाचे कोणतेही ॲप अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून डाउनलोड करू नये. कोणतीही बॅंक अशा प्रकारचे ॲप डाउनलोड करण्यास कधीही सांगत नाही, हे लक्षात ठेवावे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर - सीएफपी आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudhakar kulkarni article about Screen Sharing Fraud

Tags
टॉपिकस
Topic Tags: