बहुपयोगी "वन नेशन, वन कार्ड' 

सुधाकर कुलकर्णी 
Monday, 3 August 2020

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डला (एनसीएमसी) "वन नेशन, वन कार्ड' असेही संबोधिले जाते. याची सुरवात गेल्या वर्षी झाली असली तरी अद्याप याची सर्वसामान्यांना फारशी माहिती नसल्याचे दिसून येते.

नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डला (एनसीएमसी) "वन नेशन, वन कार्ड' असेही संबोधिले जाते. याची सुरवात गेल्या वर्षी झाली असली तरी अद्याप याची सर्वसामान्यांना फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. या कार्डाची ठळक वैशिष्ट्ये पाहिल्यावर त्याची उपयुक्तता सहज लक्षात येते. 

काय आहेत वैशिष्ट्ये? 
- केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने देशांतर्गत प्रवासी सुविधा वाढविण्यासाठी हे कार्ड उपलब्ध करून दिले आहे. 

हेही वाचा : ‘क्रिटिकल इलनेस केअर’ घेताना...

- हे कार्ड 25 बॅंका, "पेटीएम'मार्फत दिले जाते व हे डेबिट कार्ड किंवा वॉलेट पद्धतीने दिले जाते. 

- याचा वापर करून रेल्वे/बस/मेट्रो यांचे तिकीट/सिझन तिकीट अथवा मासिक पास, कॅब, पार्किंग व टोल यासारखे पेमेंट "कॉन्टॅक्‍टलेस' पद्धतीने करता येते. 

- या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या ऑनलाइन व ऑफलाइन पेमेंटसाठी हे कार्ड वापरता येते. 

- "एटीएम'मधून रोख रक्कम (रु. 25 हजारांपर्यंत) काढण्यासाठी हे कार्ड वापरता येते. विशेष म्हणजे या कार्डाने "एटीएम'मधून रोख रक्कम काढल्यास अशा रकमेच्या 5 टक्के इतका "कॅशबॅक' दिला जातो. 

- परदेश प्रवासात या कार्डाचा खरेदीसाठी किंवा अन्य पेमेंटसाठी वापर केल्यास 10 टक्के इतका "कॅशबॅक' दिला जातो. 

- रु. दोन हजारांपर्यंतचे पेमेंट "कॉन्टॅक्‍टलेस' असल्याने पिन अथवा ओटीपी टाकावा लागत नाही. एका दिवसात असे तीन व्यवहार करता येतात. 

- एका दिवसात रोख रु. 25 हजार व ऑफलाइन/ऑनलाइन रु. 25 हजार असे एकूण रु. 50 हजारांपर्यंत व्यवहार करता येतात. 

- वॉलेट कार्डामध्ये नेट बॅंकिंग/क्रेडीट/डेबिट कार्ड/भीम यासारख्या पर्यायाने किंवा बॅंकेत "कॅश काउंटर'वर रक्कम वर्ग करता येते. (रिलोड) 

- हे कार्ड पूर्णपणे भारतीय असून, रूपे कार्डामार्फत दिले जाते. आता बॅंका नवे कार्ड देताना या पद्धतीचेच कार्ड देत आहेत. 

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर- सीएफपी आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhakar kulkarni writes article about one nation one card