एनएफओ कॉर्नर : शेअर बाजाराच्या तेजीत म्युच्युअल फंडांचा पाऊस

शेअर बाजार तेजीत असला की साहजिकच गुंतवणूकदारांचे मनोधैर्य (सेंटिमेंट) उंचावलेले दिसते.
Mutual Fund
Mutual FundSakal

शेअर बाजार तेजीत असला की साहजिकच गुंतवणूकदारांचे मनोधैर्य (सेंटिमेंट) उंचावलेले दिसते. म्युच्युअल फंडांच्या नव्या इक्विटी योजनांमध्ये (न्यू फंड ऑफर - एनएफओ) गुंतवणूक करायला ते सहज तयार होतात. त्यामुळे अशा तेजीच्या काळामध्ये म्युच्युअल फंडांच्या नव्या इक्विटी योजना मोठ्या प्रमाणात बाजारात येतात आणि त्यांना प्रतिसादसुद्धा चांगला मिळतो.

चला तर मग, सध्या बाजारामध्ये कोणत्या प्रमुख नव्या इक्विटी योजना आहेत, ते पाहू.

  • निप्पॉन इंडिया फ्लेक्सि कॅप फंड आणि महिंद्रा मेनुलाईफ फ्लेक्सि कॅप योजना : संपूर्ण डायव्हर्सिफाइड योजना. लार्ज, मिड, स्मॉल अशा सर्व मार्केट कॅप मध्ये; तसेच सर्व विभागांमध्ये विशिष्ट बंधनाशिवाय गुंतवणूक. फंड व्यवस्थापकाची भूमिका महत्वाची.

  • आयडीएफसी युएस इक्विटी फंड ऑफ फंड : देशाबाहेरील कंपन्यांमध्ये गुंतवणूक. या योजनेमधील पैशांची गुंतवणूक ही जे. पी. मॉर्गन यूएस ग्रोथ फंडामध्ये होणार असून, ती फक्त अमेरिकेतील शेअर बाजारामध्ये ‘लिस्टेड’ शेअरमध्येच असणार आहे.

  • एचडीएफसी निफ्टी ५० इक्वल वेट इंडेक्स फंड : योजनेमध्ये फक्त ‘निफ्टी ५०’ मधील कंपन्या असतील. एकच फरक असेल, की ‘निफ्टी ५०’मध्ये प्रत्येक कंपनीला वेगळे वजन (वेटेज) असते; जसे, की ‘रिलायन्स’ला १० टक्के, आयसीआयसीआय बँकेला ६.४ टक्के आदी. परंतु, या योजनेमध्ये सर्व कंपन्यांना सारखेच वजन (वेटेज) असेल. ही एक पॅसिव्ह’ योजना असल्याने फंड व्यवस्थापकाची भूमिका नगण्य असेल.

  • युटीआय फोकस्ड इक्विटी फंड : कमाल फक्त ३० शेअरमध्ये गुंतवणूक असल्याने, यातील कंपन्या आणि फंड व्यवस्थापकाची भूमिका महत्त्वाची.

याशिवाय देखील काही नव्या फंड योजना बाजारात येत आहेत.

सध्याच्या बाजारातील नव्या म्युच्युअल फंड योजना

योजना सुरू बंद

निप्पॉन इंडिया फ्लेक्सि कॅप फंड २६ जुलै ९ ऑगस्ट

आयडीएफसी यूएस इक्विटी फंड ऑफ फंड २९ जुलै १२ ऑगस्ट

महिंद्रा मेनुलाइफ फ्लेक्सि कॅप योजना ३० जुलै १३ ऑगस्ट

एचडीएफसी निफ्टी ५० इक्वल वेट इंडेक्स फंड ४ ऑगस्ट १३ ऑगस्ट

यूटीआय फोकस्ड इक्विटी फंड ४ ऑगस्ट १८ ऑगस्ट

एसबीआय बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फड १२ ऑगस्ट २५ ऑगस्ट

कॅनरा रोबेको व्हॅल्यू फंड १३ ऑगस्ट २७ ऑगस्ट

प्रत्येक योजनेमध्ये कमीतकमी गुंतवणूक ५००० रुपये असेल; तसेच सर्व योजना न्यू फंड ऑफर (एनएफओ) काळानंतर बाजारात कायमस्वरूपी खुल्या होतील.

तात्पर्य :

या नव्या योजनांच्या युनिटचे मूल्य, ‘न्यू फंड ऑफर’च्या प्रस्तावित काळात १० रुपये असल्याने अनेक गुंतवणूकदारांना ते आकर्षक वाटते. परंतु, अशा योजनांचा पूर्वीचा इतिहास नसल्याने तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा योजनेची आवश्यकता असेल तरच आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने या योजनांमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते.

(लेखक म्युच्युअल फंडांचे जाणकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com