स्वीस बॅंकांतील भारतीयांचा काळा पैसा घटला!

Swiss-Bank
Swiss-Bank

झुरीच - स्वीस बॅंकांमध्ये भारतीयांकडून जमा होणाऱ्या काळ्या पैशाला काही प्रमाणात लगाम बसल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत ७४ व्या स्थानावर आला असून, यंदा या बॅंकांमध्ये ब्रिटनमधून सर्वाधिक पैसा जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्वीस नॅशनल बॅंकेने (एसएनबी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्वीस बॅंकांत इतर देशांतील नागरिक व कंपन्यांनी जमा केलेल्या एकूण काळ्या पैशाच्या तुलनेत भारतातून जमा झालेल्या पैशाचे प्रमाण ०.०७ टक्के इतके नगण्य आहे. तत्पूर्वी गेल्यावर्षी भारताने ८८ वरून थेट ७३ व्या स्थानावर उडी घेतली होती. २०१८ अखेर जमा झालेल्या एकूण रकमेत ब्रिटनचा वाटा २६ टक्के इतका आहे. 

ब्रिटनपाठोपाठ अमेरिका (२), वेस्ट इंडीज (३), फ्रान्स (४) आणि हाँगकाँग (५) या देशांचा क्रमांक लागत असून, एकूण काळ्या पैशात या देशांचा वाटा ५० टक्के इतका आहे; तर या यादीत पहिल्या १० मध्ये समाविष्ट असलेल्या देशांतील नागरिकांनी जमा केलेल्या पैशाचे प्रमाण एक तृतीयांश असल्याची माहिती ‘एसएनबी’ने दिली. बहामास, जर्मनी, लझ्मबर्ग, के मॅन बेटे  आणि सिंगापूर हे देश ‘टॉप १०’ मध्ये आहेत.

भारतापुढे असलेले देश
मॉरिशस    ७१
न्यूझीलंड५९
फिलिपिन्स    ५४
व्हेनेझुएला     ५३
थायलंड     ३९
कॅनडा     ३६ 
तुर्कस्तान     ३० 
इस्राईल     २८
सौदी अरेबिया     २१ 
जपान     १६ 
इटली     १५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com