सिंडिकेट बॅंकेची सूत्रे मृत्युंजय महापात्रांकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दहा सार्वजनिक बॅंकांच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड बुधवारी जाहीर केली. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियात (एसबीआय) कार्यरत पाच उपव्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे. 

सिंडिकेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मृत्युंजय महापात्रा यांची निवड करण्यात आली. इंडियन बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पद्मजा चंद्रू यांची निवड करण्यात आली. हे दोघेही सध्या एसबीआयमध्ये उपव्यवस्थापकीय संचालक आहेत.

याचबरोबर एसबीआयमधील उपव्यवस्थापकीय संचालक पल्लव महापात्रा, जे. पॅकिरीसामी आणि कर्नाम शेखर यांची अनुक्रमे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, आंध्र बॅंक आणि देना बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. अलाहाबाद बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एस. एस. मल्लिकार्जुन राव यांची निवड करण्यात आली आहे. अतुल कुमार गोयल आणि एस. हरिशंकर यांची अनुक्रमे युको बॅंक आणि पंजाब अँड सिंध बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. युनायटेड बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अशोक कुमार प्रधान यांना बढती देण्यात आली आहे.

बॅंकांचे नवे प्रमुख 
 इंडियन बॅंक : पद्मजा चुंद्रू   सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया : पल्लव महापात्रा 
 आंध्र बॅंक : जे. पॅकिरीस्वामी  सिंडिकेट बॅंक : मृत्युंजय महापात्रा
 अलाहाबाद बॅंक : एस. एस. मल्लिकार्जुन राव 
 बॅंक ऑफ महाराष्ट्र : ए. एस. राजीव  युको बॅंक : अतुल कुमार गोयल 
 पंजाब अँड सिंध बॅंक : एस. हरिशंकर   देना बॅंक : कर्नाम शेखर
 युनायटेड बॅंक ऑफ इंडिया : अशोक कुमार प्रधान

बॅंक ऑफ महाराष्ट्रवर ए. एस. राजीव 
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ए. एस. राजीव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची निवड तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांची कामगिरी पाहून पुढे दोन वर्षांसाठी त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Syndicate Bank Mrutyunjay Mahapatra