esakal | वित्तीय बाजारांसाठी योग्य पावले उचलणार; रिझर्व्ह बॅंकेचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

reserve-bank

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या जागतिक आणि देशांतर्गत परिस्थितीवर लक्ष असून, वित्तीय बाजारांच्या सुरुळीत कामकाजासाठी योग्य पावले उचलण्यास तयार आहोत, असे रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी स्पष्ट केले. 

वित्तीय बाजारांसाठी योग्य पावले उचलणार; रिझर्व्ह बॅंकेचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या जागतिक आणि देशांतर्गत परिस्थितीवर लक्ष असून, वित्तीय बाजारांच्या सुरुळीत कामकाजासाठी योग्य पावले उचलण्यास तयार आहोत, असे रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा नकारात्मक परिणाम झाल्यामुळे जगभरातील वित्तीय बाजारांमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांमध्येही या परिस्थितीने चिंता निर्माण झाली आहे. भारतातील वित्तीय बाजारांवरही या सर्वांचा परिणाम झाला असला तरी, तो मर्यादित स्वरूपात आहे. जागतिक आणि देशांतर्गत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, वित्तीय बाजारांचे कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्‍यक पावले उचलण्यात येतील, तत्पर असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासंदर्भात सरकारकडून पावले उचलण्यासंदर्भात अपेक्षा वाढल्या आहेत.

शेअर बाजारात परतली तेजी

loading image