esakal | आरोग्य विमा घेण्यापूर्वी घ्या काळजी;  IRDAIने दिली महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

IRDAI

मागील 4-5 महिन्यांपासून कोरोना काळात देशातील नागरिकांचा आरोग्य विम्याकडे घेण्याकडे ओढा वाढल्यांचं दिसत आहे. याचा फायदा घेऊन बऱ्याच बनावट आणि अनधिकृत कंपन्यां आरोग्य विमा विकून ग्राहकांना फसवत असल्याची गंभीर माहिती मंगळवारी IRDAI ने दिली.

आरोग्य विमा घेण्यापूर्वी घ्या काळजी;  IRDAIने दिली महत्वाची माहिती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: मागील 4-5 महिन्यांपासून कोरोना काळात देशातील नागरिकांचा आरोग्य विमा घेण्याकडे ओढा वाढल्यांचं दिसत आहे. याचा फायदा घेऊन बऱ्याच बनावट आणि अनधिकृत कंपन्यां आरोग्य विमा विकून ग्राहकांना फसवत असल्याची गंभीर माहिती मंगळवारी IRDAI ने दिली. याबद्दल ग्राहकांना सावधानतेचा इशारा IRDAI ने दिला आहे. याबद्दल भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हटले आहे की, काही अनधिकृत संस्था आणि कंपन्या रुग्णालयाच्या खर्चातील आकर्षक सूट दाखवून आरोग्य विमा विकण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मंगळवारी IRDAI काढलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये सांगितले आहे की, IRDAI रजिस्टर्ड कंपनी किंवा त्यांच्या अधिकृत एजेंटलाच विमा विकण्याची परवानगी देते. जर तुम्ही यातील सोडून दुसऱ्या कोणाकडून आरोग्य विमा घेत असाल तर तुम्ही स्वतःला अडचणीत आणत आहात, असंही IRDAI ने सांगितले आहे. देशातील अधिकृत मान्यता प्राप्त विमा कंपन्यांची माहिती IRDAIच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विमा खरेदी करताना सर्वांनी आपण योग्य पद्धतीने आणि खरा विमा खरेदी करत आहोत की नाही याची शहानिशा केली पाहिजे, असंही IRDAIच्या नोटीसमध्ये सांगितले आहे.

रिलायन्सची चांदी! अबुधाबीतील कंपनीची 5512 कोटींची गुंतवणूक

जर तुम्हाला विमा घेताना संशय आला तर तुम्ही त्या कंपनीबद्दलची माहिती IRDAIच्या वेबसाईटवर जाऊन क्रॉस चेक करु शकता. तसेच त्या विमा कंपनीला संपर्क करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. विम्याबद्दलच्या फेक कॉलपासून सावध राहिलं पाहिजे. त्यामुळे कधीही कोणताही विमा घेताना विमा कंपनीला किंवा रजिस्टर्ड एजेंटकडूनच तो खरेदी केला पाहिजे.

(edited by- pramod sarawale)