नोटा बदलताना ही खबरदारी घ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याने आपल्या सर्वांना पुढील 50 दिवस आपले खाते असलेल्या बँकेत नोटा जमा करता येणार आहेत. दरम्यान, जास्त रोकड घेऊन जाणाऱ्या लोकांना लुटण्यासाठी बॅग चोर या संधीची वाट पाहत बसलेले असतील. त्यामुळे याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. 

पोलिसांनी यासंदर्भात नागरिकांनी पुढील दक्षता घेण्यास सांगितले आहे. 

1) नोटा बदलण्यासाठी बँकेत जाताना रक्कम जास्त असल्यास भक्कम बॅगेत पैसे व्यवस्थित ठेवावेत. 
2) घरून पैसे घेऊन निघाल्यानंतर सरळ बँकेत जावे. रस्त्यात मध्ये कुठेही थांबू नये. 
3) आपल्यासोबत मदतीसाठी एखादी व्यक्ती सोबत घेऊन जावे.
4) पैशाची बॅग तुमच्या गाडीच्या डिकीत सुरक्षित ठेवल्याची खात्री करा. 
5) नोटा मोजून देण्याचा बहाणा करून जवळ येणाऱ्या बँकेच्या आवारातील भामट्यांपासून सावध राहा. 
6) नोटा मोजण्याच्या किंवा बदलून देण्याच्या बहाण्याने हे लोक आपली फसवणूक करू शकतात. 
7) बँकेतील अधिकृत कर्मचाऱ्यांकडेच काउंटरवर पैसे द्या. इतर कोणाकडेही आपल्या नोटा देऊ नका. 
8) आपल्या मदतीसाठी बँकेचे कर्मचारी व पोलिस आहेत. काही अडचण भासल्यास त्यांची मदत घ्या. 
9) आपली मदत करण्याच्या बहाण्याने भामटे आपली फसवणूक करू शकतात. 
10) ज्येष्ठ नागरिक, महिला व अपंगांनी आपल्या मदतीसाठी कोणाला तरी सोबत घेऊन जावे. 
 
Web Title: take precautions while depositing currency notes of 500 and 1000