'तालिबान' जगातील पाचवी सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना!

जाणून घ्या उत्पन्नाचा स्त्रोत काय?
taliban
talibanGoogle

तब्बल २० वर्षानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा कब्जा केल्यानं तिथली भयावह परिस्थिती आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. दररोजच्या बातम्यांमधून आपण कशा प्रकारे अफगाणिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे, कशा प्रकारे तालिबान्यांनी अफगाणमधील अनेक गावं आणि शहरं काबीज केलीत हे आपण पाहतोय. मुंबईतील ट्रेन प्लॅटफॉर्मवर जशी गर्दी पाहायला मिळते त्याप्रकारची गर्दी आपल्याला काबुल विमानतळावर पाहायला मिळाली. अशात एक प्रश्न वारंवार उपस्थित होतो, तो केवळ म्हणजे १० दिवसांत तालिबान्यांनी संपूर्ण देश कसा काय काबीज केला? असं काय झालं ज्यामुळे त्यांनी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या सैन्याला अफगाणिस्तान सोडून जाण्यास भाग पाडलं?

taliban
कुटुंबासह अश्रफ घनींना माणुसकीच्या नात्यानं आश्रय दिलाय - UAE

तालिबान कुठून पैसे गोळा करतं?

'युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम'ने (UNODC) आपल्या एका अहवालात याबाबतचा उल्लेख केला आहे. तालिबानची कमाई ही त्यांच्या काळ्या गोरख धंद्यातून होते. यामध्ये तस्करी आणि अफू हे त्यांच्या उत्पन्नाचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अफूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. अफूच्या लागवडीवर तालिबानचे नियंत्रण आहे. जगातील 80 टक्के अफूचे उत्पादन येथेच होते. तालिबान अफू विकून आणि तस्करी करून भरपूर संपत्ती कमावतो. मे 2021च्या UNODCच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानमध्ये कोरोनासाथीच्या काळातही अफूचे सर्वाधिक उत्पादन होत होते. अफगाणमध्ये 2017 पासून अफूचे विक्रमी उत्पादन झाले आहे. 2020 मध्येही अफूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली. तसेच, कोरोनामध्ये निर्यात बंद झाल्यानंतरही उत्पादनात मात्र 37 टक्के वाढ पाहायला मिळाली.

बेकायदेशीर अफूची अर्थव्यवस्था सुमारे 49 हजार कोटी रुपयांची

UNODC च्या अहवालानुसार, अफगाणिस्तानमध्ये अफूच्या उत्पादनामुळे तालिबानला सुमारे 10 हजार कोटी रुपये मिळाले. या काळात सुमारे 9,900 टन अफूचे उत्पादन झाले. या उत्पादनाच्या प्रमाणात मिळणारे उत्पन्न देशाच्या जीडीपीच्या तुलनेत जवळजवळ 7 टक्के होते. अफगाणिस्तानमध्ये बेकायदेशीर अफूची अर्थव्यवस्था सुमारे 49 हजार कोटी रुपयांची असल्याचे अहवालात सांगण्यात आले. औषधांसाठी देखील अफूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि अफगाणिस्तानातूनही अफूची मोठी निर्यात होते.

अफूच्या व्यापाऱ्यांकडून कर गोळा करणे

तालिबान केवळ अफूच्या तस्करीतून कमाई करत नाही, तर अफूच्या व्यापाऱ्यांकडून कर देखील गोळा करतो. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 2018-19 मध्ये ड्रग्जच्या व्यापारातून सुमारे 3 हजार कोटी रुपये तालिबानकडे आले होते. अहवालानुसार, तालिबानच्या विविध उत्पन्नांपैकी तब्ब्ल 60-70 टक्के औषधांच्या व्यवसायातून येते. त्यात अफू सारख्या इतर पदार्थांचा समावेश आहे. मात्र, तालिबान्यांच्या कमाईबाबत कोणतंही अधिकृत विवरण उपलब्ध नाही, म्हणूनच त्याची एकूण कमाई आणि संपूर्ण मालमत्ता निश्चित करणे अशक्य आहे.

पाचवी सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना

2016 च्या फोर्ब्सच्या अहवालानुसार, तालिबान ही जगातील पहिल्या 10 दहशतवादी संघटनांमध्ये पाचवी सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार तालिबानची वार्षिक उलाढाल 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी आहे. हा आकडा 2016 मधील म्हणजेच पाच वर्ष जुना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com