‘मिलांज’ची तापसी ब्रॅंड अँबेसिडर

पीटीआय
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नवी दिल्ली - लाइफस्टाइलचा पारंपरिक कपड्यांचा ब्रॅंड मिलांजच्या ब्रॅंड अँबेसिडरपदी अभिनेत्री तापसी पन्नू हिची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - लाइफस्टाइलचा पारंपरिक कपड्यांचा ब्रॅंड मिलांजच्या ब्रॅंड अँबेसिडरपदी अभिनेत्री तापसी पन्नू हिची नियुक्ती करण्यात आली आहे. 

कंपनीने म्हटले आहे, की मिलांजच्या उन्हाळी कलेक्‍शनमध्ये नावीन्यपूर्ण प्रकारातील पारंपरिक कपडे आहेत. यामध्ये तापसीच्या ठाम, आत्मविश्‍वासपूर्ण आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पडले आहे. सहजपणे परिधान करता येतील असे हे कपडे आहेत. आजच्या महिलांना नजरेसमोर ठेवून नव्या कलेक्‍शनची रचना करण्यात आली आहे. यातील प्रत्येक वस्त्र वैविध्यपूर्ण रंगात आणि प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. आधुनिक विचारांच्या, परंतु परंपरांमध्ये विश्‍वास असलेल्या महिलांसाठी हे कलेक्‍शन आहे. हे कलेक्‍शन लाइफस्टाइलचे सर्व स्टोअर, मिलांज स्टोअर आणि ऑनलाइन उपलब्ध आहे. 

याविषयी तापसी पन्नू म्हणाली, ‘‘मिलांजने पारंपरिकतेला नवा साज दिला आहे. पारंपरिक कपड्यांमध्ये पुनर्रचनेचा प्रयोग मिलांजने केला आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tapesi brand ambassador of Milanj