esakal | टाटा ग्रुपची रिलायन्सला टक्कर; ऑनलाईन ग्रॉसरी मार्केटमध्ये उतरणार
sakal

बोलून बातमी शोधा

tata group eyes on online grocery market in india

टाटासोबत सिंगापूरची टीमासेक होल्डिंग्ज आणि अमेरिकेची जनरेशन इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट या कंपन्या भांडवल उभारणीच्या प्रक्रियेत उतरणार आहेत. हा करार प्राथमिक भांडवल असणार आहे.

टाटा ग्रुपची रिलायन्सला टक्कर; ऑनलाईन ग्रॉसरी मार्केटमध्ये उतरणार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : ऑनलाईन मार्केट आणि रिटेल शॉपीमध्ये आपली मक्तेदारी प्रस्थापित करू पाहत असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाला भारतातील लोकप्रिय उद्योग समूह असलेल्या टाटा समूहाकडून आव्हान दिलं जाणार आहे. देशातल्या ई-कॉमर्स क्षेत्रातही टाटा समूह उतरण्याच्या तयारीत आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टाटा भांडवल उभारणार
या संदर्भात लाईव्ह मिंटने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, टाटा समूह बिग बास्केटशी भागीदारी करण्याच्या तयारीत आहे. बिग बास्केटमध्ये मुळात अलिबाबा ग्रुपची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. त्यात आता टाटा समूह हातमिळवणी करणार आहे. टाटासोबत सिंगापूरची टीमासेक होल्डिंग्ज आणि अमेरिकेची जनरेशन इनव्हेस्टमेंट मॅनेजमेंट या कंपन्या भांडवल उभारणीच्या प्रक्रियेत उतरणार आहेत. हा करार प्राथमिक भांडवल असणार आहे. यातून बिग बास्केट आपल्या कंपनी विस्ताराला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. बिक बास्केटला भारतात आपला व्यवसाय वाढवायचा आहे. मुळात टाटा समूहाची उत्पादने सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन रिटेल व्यवसायात आणि एफएमसीजीमध्येही टाटाची उत्पादने उपलब्ध आहेत. टाटाने Tata CLiQ या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मला 2016मध्ये सुरुवात केली. मात्र, त्यांचा हा प्लॅटफॉर्म ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स रिटेलच्या तुलनेत लोकप्रिय नाही. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऍप लाँच करणार
टाटा ग्रुपने यापूर्वीच एका ऍप लाँचची घोषणा केलीय. टाटा ई-कॉमर्स ऍप ऍमेझॉन आणि रिलायन्सला टक्कर देणार आहे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हे ऍप लाँच होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या व्यवसायिक सेवा एका छताखाली आणण्याचा टाटा समूहाचा प्रयत्न आहे. रिलायन्स सारखा उद्योगसमूह सातत्याने टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न करत असताना टाटा समूह या क्षेत्रात फारसा रस दाखवत नव्हता. रिलायन्सने एप्रिल 2020पासून जिओमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्यात यश मिळवलंय. कंपनीने 1 कोटी 52 लाख कोटी रुपयांचं भांडवल मिळवलं आहे.