कोविड-19चा टाटा समूहावर परिणाम झाल्याच्या बातम्या या खोट्या आणि चुकीच्या होत्या. टाटा समूहाबद्दल अत्यंत चुकीचे वृत्त आणि अफवा प्रसार माध्यमांमधून देण्यात आल्या होत्या. टाटा समूहाची नाचक्की करण्याच्या द्वेषभावनेने ही माहिती पसरवण्यात आली. टाटा समूह आणि समूहाचे चेअरमन रतन टाटा यांची नाचक्की करण्याचा हेतू यामागे होता. टाटा समूह हा नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वोतोपरी तयार आहे, असे मत चंद्रशेखरन यांनी रोखठोकपणे मांडले.
टाटा समूहाची आर्थिक स्थिती भक्कम असून समूहाकडे पुरेशी रोकड उपलब्ध आहे. त्यामुळे समूहातील कंपन्यांना रोकडचा पुरेसा पुरवठा करण्याच्या स्थितीत टाटा समूह आहे, शिवाय विस्ताराच्या नवीन उपक्रमांनाही रोकड पुरवणे शक्य आहे, असे मत टाटा समूहाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले आहे. रोकडच्या अभावी किंवा अन्य आर्थिक कारणांमुळे आमची गुंतवणूक काढून घेऊन भांडवल उभारण्याचा प्रश्नच नाही कारण समूहाची स्थिती भक्कम आहे, असेही ते पुढे म्हणाले.
टाटा समूहाच्या संचालक मंडळाची बैठक झाल्यानंतर चंद्रशेखरन बोलत होते. टाटा समूहातील सर्व कंपन्यांची वाटचाल उत्तम सुरू आहे. कोविड-19 महामारीच्या संकटकाळात टाटा समूहातील कंपन्यांसमोरील आव्हाने आणि संधी यामध्ये वाढ झाली आहे. आम्हाला खात्री आहे की समूहातील सर्व कंपन्या यातून आणखी भक्कमपणे पुढे सरसावतील, असा विश्वास चंद्रशेखरन यांनी बैठकीनंतर व्यक्त केला आहे. टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत समूहाच्या व्यवसायावर आणि कोविड-19शी संबंधित धोरणांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते आहे. अर्थात टाटा समूहाने मात्र संचालक मंडळाच्या बैठकीची माहिती दिलेली नाही.
स्टेट बँकेला 3,580 कोटींचा नफा; व्याजापोटी बँकेला 22 हजार 954 कोटीचे उत्पन्न
कोविड-19चा टाटा समूहावर परिणाम झाल्याच्या बातम्या या खोट्या आणि चुकीच्या होत्या. टाटा समूहाबद्दल अत्यंत चुकीचे वृत्त आणि अफवा प्रसार माध्यमांमधून देण्यात आल्या होत्या. टाटा समूहाची नाचक्की करण्याच्या द्वेषभावनेने ही माहिती पसरवण्यात आली. टाटा समूह आणि समूहाचे चेअरमन रतन टाटा यांची नाचक्की करण्याचा हेतू यामागे होता. टाटा समूह हा नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वोतोपरी तयार आहे, असे मत चंद्रशेखरन यांनी रोखठोकपणे मांडले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
टाटा समूहाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या वेतनात इतिहासात पहिल्यांदाच कपात करण्यात आल्यानंतर विविध बातम्या समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखरन यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. कोविड-19 आणि देशव्यापी लॉकडाऊनचा विविध क्षेत्रातील कंपन्यांवर विपरित परिणाम झाला आहे. टाटा समूहाच्या कंपन्या परिणाम झालेल्या विविध क्षेत्रात आहेत. वाहन उद्योग, विमानसेवा, हॉटेल आणि ग्राहकोपयोगी वस्तू या व्यवसायांमध्ये टाटा समूहाच्या कंपन्या कार्यरत आहेत. टाटा स्टील आणि जॅग्वार लँड रोवरलादेखील सद्यपरिस्थितीचा फटका बसला आहे.