टाटा समुहाच्या शेअर्समध्ये घसरण

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016

टाटा स्टीलच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली असून, टाटा मोटर्स आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये प्रत्येकी एक टक्क्याची घसरण झाली आहे.

मुंबई - शेअर बाजाराची आज नकारात्मक सुरुवात झाली आहे. सायरस मिस्त्री यांना अचानकपणे टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यात आल्याने याचा टाटा समुहातील कंपन्यांच्या शेअर्सवर  परिणाम होणार आहे. सध्या(9 वाजून 30 मिनिटे) सेन्सेक्स 35.75 अंशांच्या घसरणीसह 28143.33 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8702 पातळीवर व्यवहार करत 6.30 अंशांनी घसरला आहे.

बाजारात ऑटो, एफएमसीजी, आयटी, मेटल व ऑईल अँड गॅस क्षेत्रात नकारात्मक व्यवहार सुरु आहे. याऊलट, बँकिंग, हेल्थकेअर क्षेत्रात मात्र सकारात्मक व्यवहार सुरु आहे.

टाटा स्टीलच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण झाली असून, टाटा मोटर्स आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये प्रत्येकी एक टक्क्याची घसरण झाली आहे.

निफ्टीवर आयसीआयसीआय बँक, भारती इन्फ्राटेल, अदानी पोर्ट्स, सिप्ला आणि सन फार्मा यांचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर टाटा स्टील, आयडिया सेल्युलर, टाटा पॉवर, एचडीएफसी बँक आणि आयशर मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: Tata group shares plunge after Cyrus Mistry's ouster