टाटा समूहाला चंद्रा नव्या उंचीवर नेतील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

रतन टाटा यांचा विश्‍वास; निवडीचे ट्‌विटरवरून केले स्वागत 

मुंबई: टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नटराजन चंद्रशेखरन यांची निवड ही त्यांच्यातील नेतृत्वक्षमता सिद्ध करणारी असून, ते टाटा समूहाची मूल्ये जपत समूहाला वेगळ्या उंचीवर नेतील, असा विश्‍वास टाटा सन्सचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

रतन टाटा यांनी आज ट्‌विटरवरून चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीचे स्वागत केले. टाटा म्हणाले, की टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रा यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्यातील नेतृत्वक्षमतेचा हा गौरव आहे. हा जबाबदारी व्यामिश्र स्वरूपाची असली, तरी ते समूहाला नव्या उंचीवर नेतील. तसेच ते समूहाची मूल्ये आणि नीती सर्वकाळ जपतील.
चंद्रशेखर हे चंद्रा या नावाने ओळखले जातात. त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने मागील दोन महिने सुरू असलेला संचालक मंडळातील वाद अखेर संपुष्टात आला आहे. सायरस मिस्त्री यांची अचानक हकालपट्टी करण्यात आल्याने हा वाद सुरू झाला होता.

पहिले बिगरपारशी अध्यक्ष
चंद्रा हे 21 फेब्रुवारीला समूहाची धुरा स्वीकारणार आहेत. टाटा समूहाच्या 150 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका बिगरपारशी व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाली आहे. चंद्रा यांना समूह आणि समूहाची त्रिस्तरीय रचना एकसंध ठेवावी लागणार आहे. तसेच टाटा सन्समधील सर्वांत मोठा भागीदार असलेल्या टाटा ट्रस्टला सोबत घेऊन त्यांना काम करावे लागेल.

Web Title: Tata Group will carry a new level on the Moon