esakal | 'टाटा'ची किफायती योजना; होम लोनचा दर फक्त 3.99 टक्के, 8 लाखांचे गिफ्ट व्हाऊचरही
sakal

बोलून बातमी शोधा

tata housing

येऊ घातलेल्या सण-समारंभाच्या सीझनमध्ये आता टाटा हाऊसिंगने लोकांच्या घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी एक नवी संधी उपलब्ध करुन दिली आहे. 

'टाटा'ची किफायती योजना; होम लोनचा दर फक्त 3.99 टक्के, 8 लाखांचे गिफ्ट व्हाऊचरही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर असाव्यात जिथं आपल्या लोकांच्या समवेत आपला मायेचा ओलावा मिळेल. मात्र, वाढलेली लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे प्रत्येकाचं आपलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. मात्र, आता हे स्वप्न पुर्ण होण्यासाठी एक चांगली योजना आली आहे. 
तुम्हालाही घर खरेदी करायचं आहे का? तर याहून अधिक चांगली वेळ ही दुसरी कोणती असूच शकत नाही. कारण, येऊ घातलेल्या सण-समारंभाच्या सीझनमध्ये आता टाटा हाऊसिंगने लोकांच्या घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी एक नवी संधी उपलब्ध करुन दिली आहे. 

हेही वाचा - बॅंक ऑफ महाराष्ट्रला तिमाहीत 130 कोटींचा नफा
टाटा हाऊसिंग कंपनीचं म्हणणं आहे की, सरकारने रियल इस्टेट सेक्टरसाठी खूप काही दिलं आहे. आता सामान्य लोकांप्रती आमची असलेली जबाबदारी म्हणून आमची वेळ आहे लोकांसाठी सुखद असं काहीतरी घेऊन यायची. हाच चांगला उद्देश घेऊन टाटा हाऊसिंगने अत्यंत कमी व्याजदर असणाऱ्या होम लोनची योजना आणली आहे. सोबतच 8 लाख रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाऊचर द्यायचाही निर्णय घेतला आहे. मात्र, ही योजना 10 प्रोजेक्टसाठी 20 नोव्हेंबरपर्यंतच सुरु आहे. 

टाटा हाऊसिंगने अशा एका योजनेची घोषणा केली आहे ज्याअंतर्गत घर घेऊ इच्छिणाऱ्यांना होम लोनवर एका वर्षासाठी 3.99 टक्के व्याज दर भरावा लागेल आणि कंपनी संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाकी लागत स्वत:चं भरेल. 
कंपनीने आपल्या एका वक्तव्यात म्हटलंय की, या योजनेअंतर्गत ग्राहकांना एका वर्षापर्यंत केवळ 3.99 टक्के व्याज दर भरावा लागेल. बाकी लागणारी उर्वरित रक्कम  टाटा हाऊसिंग स्वत:चं भरेल.

योजनेची वैशिष्ट्ये
- स्वस्त व्याजदरावर होईल घर
- योजनेअंतर्गत 3.99 टक्के व्याजदर असेल
- सोबतच गिफ्ट व्हाऊचर देखील

कंपनीने सांगितलं की, ग्राहकांना बुकींग केल्यानंतर संपत्तीच्या आधारावर 25 हजार रुपयांपासून ते 8 लाख रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर मिळेल. हे व्हाऊचर 10 टक्के गुंतवणुक केल्यानंतर तसेच प्रॉपर्टीच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसनंतरच मिेळेल. 

हेही वाचा - स्त्रीशक्तीच्या आर्थिक साक्षरतेचा जागर

टाटा रियालीटी एँड इन्फ्रास्ट्रक्चरचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ संजय दत्त यांनी म्हटलं की कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे गेल्या काही महिन्यांपासून रियल इस्टेटचे क्षेत्राला अत्यंत वाईट पद्धतीने फटका बसला आहे. मात्र, आता यात हळूहळू सुधारणा होत असून क्षेत्रातील आर्थिक घडामोडींना गती येत आहे. 

त्यांनी म्हटलं की सरकार आणि RBI ने रियल इस्टेट सेक्टरला हुरुप देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. आणि आता घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांची मदत करण्याची प्रायव्हेट सेक्टरची वेळ आहे. 

loading image
go to top