‘टीसीएस’च्या बायबॅक योजनेत ‘टाटा सन्स’ सहभागी होणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई: 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'च्या(टीसीएस) सुमारे सोळा हजार कोटी रुपयांच्या शेअर बायबॅक योजनेत संस्थापक कंपनी 'टाटा सन्स'देखील सहभागी होणार आहे, असे टीसीएसने कळविले आहे. शेअर बाजारात उपलब्ध माहितीनुसार, टाटा सन्सची टीसीएसमध्ये 73.26 टक्के हिस्सेदारी आहे.

माहिती व तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांनी स्वतःकडील रोख संपत्ती गुंतवणूकदारांना हस्तांतरित करण्याच्या मागणीवर टीसीएसने गांभीर्याने विचार करत बायबॅकचा निर्णय घेतला.याअंतर्गत कंपनी प्रतिशेअर 2,850 रुपयांप्रमाणे सुमारे 5.6 कोटी शेअर्स 'बायबॅक' करणार आहे. त्यासाठी कंपनी एकुण 16,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. कंपनीच्या रोख साठ्यातून बायबॅकसाठी निधी वापरला जाणार आहे.

मुंबई शेअर बाजारात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा शेअर सध्या(10 वाजून 35 मिनिटे) 2491.60 रुपयांवर व्यवहार करत असून 0.47 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: Tata Sons to participate in share buy-back: Tata Consultancy Services