Tata Technologies IPO : गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी! 18 वर्षांनी येणार टाटा कंपनीचा IPO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO : गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी! 18 वर्षांनी येणार टाटा कंपनीचा IPO

Tata Technologies IPO: देशातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक कंपनी टाटा 18 वर्षांनंतर त्यांच्या कंपनीचा IPO आणणार आहे. टाटा मोटर्सने त्यांची उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीजमधील समभाग निर्गुंतवणुकीसाठी परवानगी दिली आहे.

टाटाच्या TCS ने 2004 मध्ये आयपीओ आणला. त्यानंतर कोणत्याही टाटा कंपनीचा आयपीओ बाजारात आलेला नाही. आता टाटाने एका कंपनीचा IPO आणण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये टाटा मोटर्सचा 74 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. या IPO द्वारे कंपनी जी रक्कम गोळा करेल ती रक्कम टाटा टेक्नॉलॉजीजचा विस्तार करण्यासाठी वापरणार आहे. पण IPO चा आकार किती मोठा असेल हे कंपनीने ठरवलेले नाही. IPO चा आकार बाजाराची स्थिती आणि SEBI च्या मान्यतेवर अवलंबून असेल.

टाटा ग्रुपचे आतापर्यंत एकूण 29 उद्योग आहेत. जे अजूनही बाजारात सूचीबद्ध आहेत. त्याच्या कंपनीचे काही बाजार मूल्य 314 डॉलर अब्ज (23.4 ट्रिलियन) आहे.

हेही वाचा: Credit Card Bill: क्रेडिट कार्ड ड्यु डेट निघून गेली? काळजी करू नका, 'हा' पर्याय वापरून सहज टाळा दंड

Tata Technologies चा IPO कधी येऊ शकतो? मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा ग्रुपचा IPO 2023-24 या आर्थिक वर्षात येऊ शकतो, म्हणजेच कंपनी एप्रिल ते जून दरम्यान हा IPO आणू शकते. ज्या कंपनीचा आयपीओ आहे त्याच्या आयपीओद्वारे टाटा टेक्नॉलॉजीज आपला 10 टक्के हिस्सा विकू शकते. यासाठी कंपनीकडून काम सुरू करण्यात आले आहे.

Tata Technologies कंपनी अनेक क्षेत्रात काम करते. त्यामध्ये एअरस्पेस, ऑटो, इंडस्ट्रियल हेवी मशिनरी इ. या कंपनीत एकूण 9,300 कर्मचारी काम करतात. या कंपनीचा ऑपरेटिंग नफा 645.6 कोटी आहे आणि निव्वळ नफा सुमारे 437 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या महसुलात एकूण 46 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे.