करसंकलन 14.8 टक्‍क्‍यांनी वाढले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

नवी दिल्ली: चालू वार्षिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचे करसंकलन 14.8 टक्‍क्‍यांनी वाढून 1.42 लाख कोटी रुपयांवर गेले असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. महसूलवाढीसाठी सध्या पोषक वातावरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

एप्रिल ते जून 2017 या तिमाहीमध्ये एकूण 55,520 कोटी रुपयांचे करसंकलन करण्यात आले. मात्र करसंकलन मागील वर्षीच्या तुलनेत 5.2 टक्‍क्‍यांनी कमी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. चालू आर्थिक वर्षामध्ये (2017-18) प्रत्यक्ष करसंकलनाचे 15.5 टक्‍क्‍यांचे उद्दिष्ट असून ते 9.8 लाख कोटी होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला. व्यावसायिक प्राप्तिकर (सीआयटी) 4.8 टक्‍क्‍यांनी वाढला असून "सीआयटी'मधील निव्वळ वाढ 22.4 टक्‍क्‍यांवर गेली आहे. रोखे व्यवहारांवरील करासह (एसटीटी) वैयक्तिक प्राप्तिकरामध्ये (पीआयटी) 12.9 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. "पीआयटी'मधील निव्वळ वाढ 8.5 टक्के नोंदविली गेली आहे.

Web Title: Taxes increased by 14.8 percent

टॅग्स