टीसीएस, इन्फोसिस, विप्रोने केली 28,000 कर्मचाऱ्यांची भरती !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

 आयटी क्षेत्रात नोकऱ्यांचा सुकाळ दिसून येतो आहे. भारतीय आयटी सर्व्हिसेस कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केल्याचे दिसून येते आहे.

 मुंबई: चालू आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात नोकऱ्यांचा सुकाळ दिसून येतो आहे. पहिल्या तिमाहीत उत्तम कामगिरी केल्यानंतर भारतीय आयटी सर्व्हिसेस कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केल्याचे दिसून येते आहे. पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षाच्या तुलनेत नोकरभरतीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि विप्रो या तीन आघाडीच्या भारतीय कंपन्यांनी पहिल्या तिमाहीत एकत्रितरित्या 28,157 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. 

पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत त्यात 59 टक्के वाढ झाली आहे. इतर क्षेत्रांमध्ये अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे नोकरकपात होत असताना आयटी क्षेत्रात मात्र मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होताना दिसते आहे. टीसीएसने एकट्यानेच पहिल्या तिमाहीत 14,097 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. तर इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीत 14,000 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. 

 आयटी कंपन्यांनी सरलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. ते अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. शिवाय कंपन्यांच्या नवीन नोकरभरतीमुळे चित्र बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TCS Infosys Wipro hire over 28000 employees in September quarter