'टीसीएस'चा नफा 8 हजार 105 कोटींवर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जानेवारी 2019

मुंबई: देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 105 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. निव्वळ नफ्यात 24.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 6 हजार 531 कोटी रुपयांचा नफा झाला होता. टाटा समूहाच्या एकूण नफ्यात टीसीएसचा मोठा वाटा आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल 20.8 टक्क्यांनी वाढून 37 हजार 338 कोटी रुपयांवर पोचला आहे, जो गेल्यावर्षी याच काळात 30 हजार 904 कोटी रुपये होता.

ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या तिमाहीत टीसीएसने 6,827 लोकांची भरती केली आहे असून आता एकूण कर्मचारी संख्या 4 लाख 17 हजार 929 वर पोचली आहे. 

कंपनीने एका रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरसाठी 4 रुपये प्रतिशेअर लाभांश घोषित केला आहे. आज मुंबई शेअर बाजारात शेअर 1888.15 रुपयांवर व्यवहार करत बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 7 लाख 08 हजार 506.52 कोटींचे बाजारभांडवल आहे. 
 
Web Title: TCS Q3 profit jumps 24pct YoY to Rs 8,105 cr