...तर तुमचे बजेट कोलमडणार

...तर तुमचे बजेट कोलमडणार

मुंबई: सलग दुसऱ्यांदा पतधोरणात व्याजदरातील व्याजदर वाढ सामान्यांसाठी खर्चिक ठरणार आहे. गेल्या पतधोरणात आरबीआयने पाव टक्‍क्‍याने दर वाढवला होता. याच कालावधीत बॅंकांनी कर्जदरात 0.10 ते 0.15 टक्‍क्‍याची वाढ केली होती. आता पुन्हा पाव टक्का दर वाढवल्याने बॅंका हा भुर्दंड ग्राहकांवर लादतील. गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा दर पाव ते अर्धा टक्‍क्‍याने वाढण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास कर्जाच्या मासिक हप्ता फेडण्यासाठी कर्जदारांना पदरमोड करावा लागेल. बॅंकांनी पाव टक्‍क्‍याने व्याजदर वाढवल्यास गृह कर्जाचा मासिक हप्ता किमान 750 रुपयांनी वाढेल, असा अंदाज आहे. ऐन सणासुदीत त्यांचे मासिक बजेट कोलमडणार आहे. 

"आरबीआय"ने 28 जानेवारी 2014 मध्ये रेपो दर पाव टक्‍क्‍याने वाढवून 8 टक्के केला होता. त्यानंतर गेल्या साडेचार वर्षात बॅंकेने रेपो दरात तब्बल सहा वेळा दरकपात करून रेपो दर दोन टक्‍क्‍यांनी कमी केला. 

जीएसटी कौंसिलने ग्राहकोपयोगी वस्तूंच्या करात कपात केली आहे. यामुळे या वस्तूंच्या विक्रीला चालना मिळणार असून कर्जदर स्थिर राहिल्याने फायदा होईल. 

"जून"मधील आर्थिक आकडेवारी ठरली निर्णायक 

किरकोळ चलनवाढ 5 टक्के 

घाऊक चलनवाढ 5.77 टक्के 

पायाभूत क्षेत्राचा विकासदर 6.7 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com