टाटा ग्रुपच्या 'या' 2 स्‍टॉक्‍समध्ये 33% रिटर्न मिळण्याचा तज्ज्ञांना विश्वास…

ब्रोकरेज हाऊसने तिमाही निकाल आणि कंपनी अपडेटनंतर या दोन्ही शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
stocks
stockssakal

बाजारात सध्या अस्थिरता दिसून येत आहे. या दरम्यान, जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार स्टॉक समाविष्ट करायचे असतील, तर टाटा ग्रुपचे दोन शेअर्स, व्होल्टास (Voltas) आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा (Tata Group) विचार तुम्ही करु शकता.

ब्रोकरेज हाऊसने तिमाही निकाल आणि कंपनी अपडेटनंतर या दोन्ही शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

stocks
Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार तेजीत बंद, गुंतवणुकदारांना दिलासा

व्होल्टास (Voltas) - 1,318 रुपयांचे टारगेट

ब्रोकरेज फर्म आनंदराठीने टाटा व्होल्टासवर बाय रेटींग दिले आहे. तर 1,318 रुपये टारगेट ठेवण्यात आले आहे. 11 ऑगस्ट 2022 रोजी व्होल्टसच्या शेअरची किंमत 989 रुपयांवर होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवरून सुमारे 33 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभरात आतापर्यंत हा स्टॉक सुमारे 3 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचवेळी एडलवाईज सिक्युरिटीजनेही व्होल्टासवर बाय रेटींग दिले आहे. शिवाय 1,150 रुपयांचे टारगेट ठेवले आहे.

कंपनीचे जून 2022 (Q1FY23) तिमाही निकाल मजबूत असल्याचे ब्रोकरेज फर्म आनंदराठींचे म्हणणे आहे. महसूल वाढ मजबूत झाली आहे. मात्र, मार्जिनवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत, 2023 मध्ये, महागाईचा परिणाम ग्राहकांपर्यंत पोहोचवणे खूप महत्वाचे असेल. कंपनीचा मार्केट शेअर तिमाही आधारावर वाढला आहे.

चलनवाढ लक्षात घेऊन, ब्रोकरेजने FY23e/FY24e साठी EBITDA/निव्वळ उत्पन्न अंदाजे 12 टक्के आणि 17 टक्क्यांनी कमी केले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार, स्टॉक 18.5/26 च्या 53x/38x FY23e/FY24e EPS वर ट्रेड करत आहे. शेअरवर बाय रेटींग कायम आहे, पण टारगेट 1400 वरून 1318 पर्यंत कमी करण्यात आले आहे.

stocks
Stock Market : आज सेन्सेक्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 57, 823 वर उघडला

टाटा कंझ्युमर्स (Tata Consumer) - 925 पर्यंत वाढणार ?

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी टाटा कंझ्युमरवर (Tata Consumer) बाय रेटींग कायम ठेवले आहे. तर टारगेटॉ 890 रुपये ठेवले आहे. कंपनीने जून 2022 च्या तिमाहीत चांगली ऑपरेटिंग परफॉर्मंस दाखवल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. कंपनीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले आहेत. फूड बिझनेसमधून कंपनीला पुढील वाढीसाठी फायदा होण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेजने FY23 आणि FY24 चे कमाईचे अंदाज कायम ठेवले आहेत. गेल्या वर्षभरात स्टॉक रिटर्न जवळपास सपाट आहे.

एडलवाईज सिक्युरिटीजनेही टाटा कंझ्युमरवर (Tata Consumer) बाय रेटींग दिले आहे. तसेच, टारगेट 925 रुपये ठेवण्यात आले आहे. 11 ऑगस्ट 2022 रोजी शेअरची किंमत 773 वर होती. अशा प्रकारे, या स्टॉकमध्ये सुमारे 20 टक्के परतावा दिसू शकतो. महागाईचा दबाव असतानाही कंपनी मार्जिन राखण्यात यशस्वी ठरल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. प्राइस करेक्‍शनमुळे शीतपेयांच्या महसुलात 4 टक्क्यांनी (YoY) घट झाली आहे. वर्षाच्या आधारावर, इंडिया फूड्स विभागामध्ये 19 टक्के वाढ झाली आहे, तर मिठाच्या क्षेत्रामध्ये जून तिमाहीत दोन अंकी वाढ झाली आहे.

stocks
Stock Split: स्टॉक स्प्लिट म्हणजे नेमकं काय? शेअरहोल्डरला कसा होतो फायदा?

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com